AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, ‘तो’ Video पाहून म्हणाल…

Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक... अजित पवार देखील म्हणालेले, 'सांगत राहा त्यामुळे मला देखील कळेल आपलं काय योग्य आहे आणि काय', व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, 'तो' Video पाहून म्हणाल...
अजित पवार
| Updated on: Feb 03, 2026 | 2:53 PM
Share

Ajit Pawar: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अद्यापही राज्या सावरलेलं नाही. दादांच्या निधनानंतर कामाचा माणूस सोडून गेला… अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दादांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी देखील. दादांचे फक्त राजकारण नाही तर, इतर क्षेत्रातील लोकांसोबत देखील चांगले संबंध होते. एका कार्यक्रमात मराठी अभिनेता निलेश साबळे यांनी केलेल्या अभिनेयाचं कौतुक दादांनी केलं आणि एक महत्त्वाची गोष्ट देखील सांगितली.

‘झी चित्र गौरव पुरस्कार 2024’ कार्यक्रमाचा देखील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. तेव्हा अभिनेता निलेश साबळे देखील स्टेज होता. तर गायक अवधूत गुप्तेनं अजित पवार यांना विचारलं की, ‘अजित पवार नावाचा बायोपिक झाला, तर कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका करावी असं तुम्हाला वाटतं?’ यावर दादांनी ‘डॉक्टर निलेश साबळेनं करावा असं वाटतं…’ म्हणाले होते. यावर निलेश यांच्या अभिनयाचं आणि विनोदबुद्धीचं कौतुक करत, अजित पवार यांनी मजेदार किस्सा सांगितला.

अजित पवार म्हणाले, ‘मी देखील निलेश साबळे काय बोलतात ते ऐकत असतो…आम्ही कधीच आरशासमोर प्रॅक्टिस करत नाही. एकदा माईक हातात घेतल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतू त्यांनी बऱ्याचदा याठिकाणी… याठिकाणी… याठिकाणी हा शब्द वापरला… मी तेव्हापासून ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीतकमी वापरता येईल तेवढा कमी वापरायचा… त्यानंतरच्या काळात हा शब्द अजित पवार यांनी कमी केला… त्यामुळे अधून – मधून तुम्ही अशी माझी नक्कल करत राहा आणि त्याच्यातून मला देखील कळेल आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे…’ असं देखील अजित पवार म्हणाले होते.

अजित पवार यांचं निधन

बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी एक बातमी समोर आली. अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं… अजित पवार यांचं निधन झालं… अशी बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून बारामती येथे सभेला जात असताना अजि पवार यांचं विमान शेतात कोसळलं आणि स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्यासोबत इतर पाच जणांचं देखील विमान अपघातात निधन झालं आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...