AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचं निधन; सामाजिक, साहित्य क्षेत्रात हळहळ

प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचं निधन झालं आहे. एका प्रसिद्ध वृत्त समूहात ते ब्रँड मॅनेजर म्हणून कार्यरत होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचं निधन; सामाजिक, साहित्य क्षेत्रात हळहळ
Pushkar ShrotriImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2026 | 9:50 AM
Share

मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे. पुष्करचे वडील सुधाकर श्रोत्री हे वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व होते. रविवारी 1 मार्च रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तुषार श्रोत्री, पुष्कर श्रोत्री आणि केतन श्रोत्री हे पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर श्रोत्री यांच्या निधनाने साहित्य, सामाजिक आणि वृत्तपत्र वितरण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. एका नामांकित वृत्त समूहात त्यांनी तब्बल 65 वर्षे वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं. त्यासोबतच त्यांना साहित्याची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत.

सुधाकर श्रोत्री यांनी लिहिलेल्या ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीत स्पेशन’ आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर आधारित ‘खास सचिन’ या कविता संग्रहांचं प्रकाशन झालं आहे. सुधाकर श्रोत्री हे अखेरपर्यंत ‘पार्लेकर कायस्थ’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार, 2 मार्च) सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुंबईत विलेपार्ले इथल्या पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकर यांचा पुत्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात सक्रिय आहे. ‘श्शsss घाबरायचं नाही’, ‘लाभले आम्हास भाग्य’, ‘अ पेईंग घोस्ट’ ही त्याची नाटकं सध्या गाजत आहेत. आपल्या जडणघडणीत वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचं पुष्करने अनेकदा विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात श्रोत्री कुटुंब वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी सुधाकर श्रोत्री यांनी अखेरचा श्वास घेतला.

पुष्कर हा मराठी आणि हिंदी कलाविश्वात कार्यरत असून तो निर्माता आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. त्याने मराठी आणि हिंदी भाषांमधील 25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2014 मध्ये त्याने ‘रेगे’ या चित्रपटात पोलीस अधिकारी सचिन वाझेंची भूमिका साकारली होती. हसवा फसवी, सूर्याची पिल्ले, एक परिपूर्ण हत्या, आजीबाई जोरात ही त्याची नाटकंसुद्धा विशेष गाजली आहेत. पुष्करने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही काम केलंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...