पुष्कर श्रोत्री उलगडणार सासू सुनेचं गमतीशीर नातं, ‘सून सासू सून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं असतं. सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे.

पुष्कर श्रोत्री उलगडणार सासू सुनेचं गमतीशीर नातं, ‘सून सासू सून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : ‘मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने नव्या नव्या संकल्पनेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नवनव्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणारी स्टार प्रवाह वाहिनी नव्या वर्षात असाच एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं असतं. सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे (Pushkar Shrotri hosting Star Pravah New Show soon sasu soon).

विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर, फक्त आणि फक्त सुसंवाद असणार आहे. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम अभिनेता पुष्कार श्रोत्री करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेल्या कुटुंबाला भेटण्याचं काम पुष्कर या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहे.

सासू-सून नव्हे, मैत्रिणी…

नव्या वर्षातल्या या नव्या पर्वणीबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सासू आणि सून हे नातं अनोखं आहे. कुटुंब आणि घर जपणाऱ्या या दोघी कधी मैत्रीणी तर कधी मायलेकी असतात.  कधी कुरबुर असते पण ती क्षणिक. अश्या हळुवार नाती जपणाऱ्या दोघींना भेटुन समजून थोडा छान वेळ घालवता येईल असा का कार्यक्रम आहे.’ (Pushkar Shrotri hosting Star Pravah New Show soon sasu soon)

उलगडणार प्रेमाचं नातं!

या कार्यक्रमाचं वेगळेपण सांगताना पुष्कर श्रोत्री म्हणाले, ‘सून सासू सून हा खूप वेगळा शो आहे. यामध्ये मी प्रेक्षकांच्या घरात जाऊन त्यांच्या खऱ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच, शब्दाने शब्द वाढतो. छोट्या मोठ्या कुरबुरी या प्रत्येकाच्या घरात असतात. पण तरीसुद्धा आपापसातले हेवेदावे विसरुन आमचं कसं मस्त चाललं आहे हे दाखवणारा हा कार्यक्रम आहे. याशोमध्ये अनेक वेळा सासूबाई मला असं सांगतात की, माझ्या सख्या मुलीने केलं नसतं इतकं सुनबाईने माझ्यासाठी केलं, किंवा सुनबाई सांगते की अनेक प्रसंगात सासूबाई माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, आईप्रमाणे त्यांनी मला साथ दिली. सासू-सुनेच्या अश्या अनेक जोड्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला भेटत आहेत.’((Pushkar Shrotri hosting Star Pravah New Show soon sasu soon))

(Pushkar Shrotri hosting Star Pravah New Show soon sasu soon)

कोव्हिड नियमांचे पालन करून चित्रीकरण

‘आपल्या प्रत्येकालाच जगण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन हवा आहे. हीच सकारात्मकता सून सासू सून या कार्यक्रमातून मिळेल याची खात्री आहे. या कार्यक्रमातून सासू-सुनेच्या नात्याची गमतीशीर गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळेल. सासू-सून म्हटल्यानंतर भांडणं, रुसवे फुगवे, अबोला, मीच कशी वरचढ आहे हे दाखवणं या सगळ्या गोष्टी आल्या. मात्र, या कार्यक्रमात यातली एकही गोष्ट नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या आवडीची गोष्ट करायला मिळते आहे, ती म्हणजे लोकांशी गप्पा मारणं. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात शूटिंग करत आहोत. मला खूप अभिमान वाटतो आहे’, असे अभिनेता पुष्कर श्रोत्री एका प्रसिद्ध वेब साईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

(Pushkar Shrotri hosting Star Pravah New Show soon sasu soon)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI