Sharad Kelkar : जॅकी श्रॉफ यांचा ‘हा’ चित्रपट शरद केळकरचा सर्वात आवडता; म्हणाला, ‘अशी व्यक्ती भेटलीच नाही…’

शरद केळकर याने जॅकी श्रॉफ यांचे केले कौतुक, जॅकी श्रॉफ सोबत काम करणं शरद केळकरचं होतं स्वप्न, जॅकी श्रॉफ यांनी केलेला एक सिनेमा शरद केळकरचा आवडीचा आहे, तो काय म्हणाला जाणून घ्या.

Sharad Kelkar : जॅकी श्रॉफ यांचा हा चित्रपट शरद केळकरचा सर्वात आवडता; म्हणाला, अशी व्यक्ती भेटलीच नाही...
sharad kelkar
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 25, 2026 | 4:13 PM

अभिनेता शरद केळकर सध्या ‘काली खेती’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटांत त्याच्यांसोबत अभिनेते जॅकी श्रॉफही आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शरद केळकर यांनी जॅकी श्रॉफ यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं. यावेळी त्यांने जॅकी श्रॉफ यांचा ‘गर्दिश’ हा चित्रपट आपला सर्वकालीन आवडता असल्याचं सांगितलं .यावेळी त्याने जॅकी श्रॉफ यांचा गर्दिश हा चित्रपट आपला सर्वकालीन आवडता    असल्याचं सांगितलं.

‘गर्दिश’ हा माझा सर्वात आवडता चित्रपट

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शरद केळकर यांनी जॅकी श्रॉफ आणि दिग्दर्शक हरिस इम्तियाज खान यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्याने गर्दिश चित्रपटाचं विशेष कौतुक केलं. ते म्हणाले, गर्दिश हा माझा सर्वकालीन आवडता चित्रपट आहे. फक्त चित्रपटचं नाही तर त्यातील गाणीही मला आवडतात. गर्दिश हा चांगला चित्रपट आहे असं न वाटलेली व्यक्ती मला भेटलेली नाही. हा एक अप्रतिम चित्रपट आहे. कदाचित जॅकी श्रॉफ यांचाही हा आवडता चित्रपट असावा, पण मी चुकीचा असू शकतो. हा एक कल्ट चित्रपट आहे.

Loading...

 

जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न झालं पूर्ण

शरद केळकर यांनी सांगितलं की,त्यांना लहानपणापासून जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. केवळ अभिनेचा म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही त्यांना जाणून घ्यायचं होतं. दोघांचा स्वभाव आणि आवाजही एकमेकांशी मिळताजुळता असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘काली खेती’ या चित्रपटामुळे त्यांना आपल्या बालपणीच्या आवडत्या कलाकारसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाची संपूर्ण टीमही चांगली होती, असंही त्याने सांगितलं.

चित्रपटातील प्रत्येक फ्रेमचं कौतुक केलं

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मॉनिटरवर दृश्य पाहताना प्रत्येक फ्रेम इतकी सुंदर दिसत होती की, त्यासाठी ग्रेडिंग किंवा कलर करेक्शनची गरज भासणार नाही. असं आपल्याला वाटल्याचं शरद केळकर याने सांगितलं. हा अनुभव खूप छान असल्याचंही त्याने म्हटलं.

दरम्यान काली खेती या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हरिस इम्तियाज खान यांनी केलं असून, निर्मिती सना खान यांनी ब्लॅककॅनव्हास स्टुडिओच्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us