AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पाणीपुरी नाही तर, चहासोबत बनवा ‘पेरी-पेरी भाजलेले काजू’, झटपट जाणून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अनेकांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. पण रोज रोज नवीन काय बनवायचं आसा प्रश्न कायम उपस्थित होतो. तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहासोबत 'पेरी-पेरी भाजलेले काजू' खाऊ शकतो... झटपट जाणून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पाणीपुरी नाही तर, चहासोबत बनवा 'पेरी-पेरी भाजलेले काजू', झटपट जाणून घ्या रेसिपी
| Updated on: Nov 25, 2026 | 4:13 PM
Share

संध्याकाळी चहासोबत अनेक जण खारी – बिस्किट खातात. पण अनेकांना संध्याकाळी चटपटीत पदार्थ खायला आवडतात. अशात रोज शेवपुरी, पाणीपुरी खाऊन देखील कंटाळा येतो. अशात ‘पेरी-पेरी भाजलेले काजू’ असतील तर खाण्याची चिंताच मिटेल… तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या काजूंपासूनही असा नाश्ता बनवू शकता, जो एकदा खाल्ल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. तुम्ही घरीच पेरी-पेरी भाजलेले काजू बनवू शकता. काजूचा सौम्य गोडवा आणि मसाल्यांचा तिखटपणा एकत्र येऊन एक अप्रतिम चव निर्माण होते.

या निमित्ताने, बाजारात मिळणाऱ्या महागड्या फ्लेवर्ड काजूंऐवजी घरीच काहीतरी नवीन करून पाहा… या पदार्थाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही किंवा स्वयंपाकघरात तासन्तास वेळही घालवावा लागत नाही.

पेरी-पेरी रोस्टेड काजू बनवण्यासाठी तुम्हाला काय लागेल?

हा कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी एक कप काजू, एक चमचा पेरी-पेरी मसाला आणि एक चमचा तूप घ्या. याव्यतिरिक्त, तुम्हाला प्रत्येकी अर्धा चमचा लाल मिरची पूड, काळी मिरी पूड, चाट मसाला आणि लसूण पूड लागेल. तसेच, चवीनुसार मीठ ठेवा. जर तुम्ही मुलांसाठी काजू बनवत असाल तर लाल मिरचीचं प्रमाण कमी करू शकता. एवढंच साहित्य तुम्हाला लागेल. सर्व साहित्य एक बाजूला ठेवा आणि

पॅनमध्ये पेरी-पेरी रोस्टेड काजू कसे बनवायचे?

सर्वप्रथम, एक कप काजू घ्या. काजूमध्ये अजिबात ओलावा नाही याची खात्री करा. जर ते थोडे ओलसर असतील, तर त्यांना थोडा वेळ मोकळ्या हवेत ठेवून सुकवा. आता एका लहान वाटीत पेरी-पेरी मसाला, लाल मिरची पूड, काळी मिरी पूड, चाट मसाला, लसूण पूड आणि मीठ घाला. सर्व मसाले व्यवस्थित एकत्र मिसळा. जर तुम्ही मुलांसाठी काजू बनवत असाल, तर लाल मिरच्यांचे प्रमाण थोडे कमी करू शकता.

त्यानंतर एका भांड्यात काजू घ्या आणि त्यात एक छोटा चमचा वितळवलेलं तूप घाला. आता तयार केलेला मसाला काजूंवर टाका आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिसळा, जेणेकरून प्रत्येक काजूवर मसाल्याचा थर तयार होईल. आता गॅसवर एक पातेलं ठेवून मंद आचेवर गरम करा. त्यात मसाले लावलेले काजू घाला आणि सतत ढवळत सुमारे 5 ते 7 मिनिटं भाजून घ्या. आच खूप मोठी होणार नाही याची काळजी घ्या, कारण जास्त उष्णतेत काजू सहज जळू शकतात. जेव्हा काजू हलके सोनेरी आणि कुरकुरीत होतील, तेव्हा गॅस बंद करा.

काजू एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. ते गरमागरम खाण्याऐवजी, थोडा वेळ थंड होऊ द्या, कारण थंड झाल्यावर त्यांचा कुरकुरीतपणा वाढतो. अशाप्रकारे तुमचे कुरकुरीत पेरी-पेरी भाजलेले काजू तयार आहेत.

पेरी-पेरी भाजलेले काजू कसे साठवायचे?

जर तुम्ही एकाच वेळी जास्त काजू बनवले असतील, तर ते साठवणे देखील सोपे आहे. फक्त ते पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात ठेवा. गरम काजू डब्यात ठेवल्याने त्यात ओलावा साचू शकतो आणि त्यांचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो. ते थंड आणि कोरड्या जागी ठेवा.

Follow Us
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा