AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पहाटेच्या शपथविधीमुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्या, शिवसेना कोणाची प्रकरणात मोठं ट्विस्ट, सिब्बल यांचा माइंड गेम

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर न्यायालयात आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी रिजॉइंडर देताना सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.

मोठी बातमी! पहाटेच्या शपथविधीमुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्या, शिवसेना कोणाची प्रकरणात मोठं ट्विस्ट, सिब्बल यांचा माइंड गेम
शिवसेना कोणाची प्रकरणात मोठं ट्विस्ट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 4:00 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे.  शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा या प्रकरणात आधीच युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे रिजॉइंडर देत आहेत.  यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे.  त्यांनी यावेळी 2019 मध्ये झालेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा देखील यावेळी न्यायालयात दाखला दिला आहे.

2019 मध्ये भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र त्यावेळी भाजपने सरकार स्थापनेचं निमंत्रण नाकारलं होतं. त्यावेळी तर शिवसेना आणि भाजपची निवडणूक आधीच युती होती. त्यानंतर कोणाचंही सरकार बनल नाही, त्यावेळी राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलं.  त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथ घेतली. त्यावेळी तरी निवडणुकीआधी त्या दोघांची कुठे युती होती? असा सवाल यावेळी सिब्बल यांनी न्याायलयात उपस्थित केला आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती, परंतु त्यानंतर जनादेश नाकारून उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली, त्यांनी आधी युती नव्हती, असा युक्तिवाद शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला होता. त्याला आता कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं आहे.

पुढे बोलताना कपिल सिब्बल यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढे महाविकास आघाडी सरकार आलं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंसह दादाजी भुसे, गुलाबराव पाटील हे मंत्रीपदावर होते.  राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून अचानक त्यांना ही आघाडी चुकीची वाटायला लागली.  त्या दिवशीपर्यंत कोणाचाच विरोध नव्हता, कोणालाच काही चुकीचं वाटत नव्हतं.  जी लोकं आज विचारधारा वैगेरे सांगत आहेत, निवडणूक पूर्व युती संगत आहेत,  त्यांची राष्ट्रवादीसोबत तशी युती होती का? असा सवालही यावेळी सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

विधिमंडळ पक्षातील बहुमत हे राजकीय पक्षात कस शिफ्ट होऊ शकत? निवडून आलेले विधिमंडळ सदस्य हे राजकीय पक्षाच्या अंतर्गत राहतील. विधिमंडळातील बहुमत राजकीय पक्ष ठरू शकत नाही आणि त्यापेक्षा मोठंही अजिबात ठरू शकत नाही, असा युक्तिवादही यावेळी सिब्बल यांनी केला आहे.

Follow Us
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...