AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Symbol Hearing : ठाकरेंच्या वकिलाने पकडली एकनाथ शिंदे यांची ती घोडचूक? सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद; मोठा ट्विस्ट?

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची मोठी चूक उघड केली. शिंदे गट राजकीय पक्ष नसतानाही त्यांनी पक्षाच्या लेटरहेडवर राज्यपालांना पत्र दिलं. हा युक्तिवाद शिंदे गटासाठी अडचणीचा ठरला असून, प्रकरण निर्णायक वळणावर पोहोचले आहे. दहाव्या अनुसूचीचा संदर्भ देत सिब्बल यांनी शिंदे गटाचा व्हिपही अनैतिक ठरवला.

Shivsena Symbol Hearing : ठाकरेंच्या वकिलाने पकडली एकनाथ शिंदे यांची ती घोडचूक? सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद; मोठा ट्विस्ट?
eknath shinde Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 3:53 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीच्यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची एक अत्यंत महत्त्वाची चूक पकडली आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच असित्त्वात नसताना त्यांनी राज्यपालांना लेटरपॅडवर पत्र दिलंच कसं? असा बिनतोड युक्तिवादच कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याने या प्रकरणात काय निर्णय येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठात ही सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद या आधीच संपलेला आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडर घेऊन पुन्हा युक्तिवाद सुरू केला आहे. आजच्या युक्तिवादाच्यावेळी सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या वकिलाने मांडलेले सर्व मुद्दे खोडून काढले.

गोगावले व्हीप हेच अनैतिक

विधिमंडळ पक्षातील बहुमत हे राजकीय पक्षात कसं शिफ्ट होऊ शकतं? निवडून आलेले विधिमंडळ सदस्य राजकीय पक्षाच्या अंतर्गतच राहतील. विधिमंडळातील बहुमत राजकीय पक्ष ठरू शकत नाही. हाच तर 10 व्या सूचीचा नियम आहे. शिंदे गटाने भरत गोगावले यांना व्हिप नेमणे हे 10 व्या सूचीनुसार अनैतिक आहे. गोगावले यांचा व्हीप हेच मुळात चुकीच आहे, असा युक्तिवादही सिब्बल यांनी केला.

अन् चूक पकडली

शिंदे हे पक्षाचे प्रमुख नव्हते, त्यांचा राजकीय पक्ष नव्हता. तरीही त्यांनी पक्षाच्या लेटरपॅडवर राज्यपालांना पत्र देण्याची चूक सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. पक्षाचे नेते आम्ही होतो. तुम्ही नाही. प्रतिनिधी सभेत देखील आमच बहुमत होतं. असं असताना शिंदेंच्या व्हिप कडून राज्यपालांना पत्र देणं हे सरकारला धक्का देण्याचे प्रयत्न होते. विरोध होता तर पक्षात शिंदेंनी बैठक बोलायला पाहिजे होती. तुम्ही (शिंदे) राजकीय पक्षच नाही, तर तुम्ही पक्षाच्या लेटर हेडवर पत्रच पाठवू शकत नाही, असा युक्तिवाद करतानाच पक्ष नसताना शिंदे यांनी जर कोणाला नोटीस बजावली किंवा काही पत्र व्यवहार झाला तर तो स्वाभाविक चुकीचा आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

बाहेरच्या राज्यात बसून…

शिंदे गटाचे आमदार गुजरात आणि आसाममध्ये गेले. ही दोन्ही भाजप शासित राज्य होते. शिंदे गटाने जो ठराव केला, तो ठराव आसाम राज्यात बसून केला. महाराष्ट्र विधानसभेचा व्यवहार दुसऱ्या राज्यात बसून कसा होईल? असा कळीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

Follow Us
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...