AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परफ्युममध्ये अल्कोहोल का घातले जाते? जाणून घ्या विज्ञान

बहुतेक परफ्युममध्ये अल्कोहोल असते. अनेकदा याचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांपर्यंत असू शकते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्यामध्ये अल्कोहोल का घातले जाते, हे अनेकांना माहीत नसते. याचे उत्तर जाणून घ्या.

परफ्युममध्ये अल्कोहोल का घातले जाते? जाणून घ्या विज्ञान
Why is Alcohol used in perfume
| Updated on: Nov 25, 2026 | 3:48 PM
Share

परफ्यूम तर रोजच्या वापरातली गोष्ट आहे. हजारो लोक रोज वापरतात. पण परफ्यूमच्या बाटलीतून येणारा सुगंध प्रामुख्याने अल्कोहोलमुळे असतो. हा केवळ त्यातील सुगंधी द्रव्यामुळे नसतो. तुम्हाला माहित आहे का बहुतेक परफ्यूममध्ये ७० ते ९० टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. पण कंपन्या त्यात अल्कोहोल का घालतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला जाणून घेऊयात…

परफ्यूम हे तीन घटकांचे मिश्रण असते!

सुगंधी तेल, अल्कोहोल आणि थोड्या प्रमाणात पाणी या तीन गोष्टी परफ्यूममध्ये असतात. गुलाब, मोगरा, चंदन किंवा कस्तुरी यांसारखी सुगंधी तेले अत्यंत घट्ट असतात. ती थेट त्वचेवर लावणे सोपे किंवा सोयीस्कर नसते. त्यांना वापरण्यायोग्य बनवण्यासाठी एका माध्यमाची गरज असते आणि हेच काम अल्कोहोलद्वारे केले जाते. परफ्युममध्ये अल्कोहोल का घातले जाते आणि त्याशिवाय परफ्युम तयार करणे शक्य आहे का, हे जाणून घ्या.

परफ्युममध्ये अल्कोहोल का घातले जाते?

परफ्युममध्ये वेगवगेळ्या प्रकारचे सुगंधी तेल आणि इतर घटक असतात. ‘सिग्मा लाइफस्टाइल्स अँड के.टी.’ चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक ध्रुव सयानी यांच्या मते, परफ्युममधील सुगंधी घटकांना विरघळवण्यासाठी प्रामुख्याने अल्कोहोलचा वापर केला जातो. एकसमान मिश्रण तयार करण्यासाठी हे घटक योग्य प्रमाणात मिसळणे आवश्यक असते आणि या कामासाठी इथेनॉल अत्यंत प्रभावी ठरते.

तुम्ही कदाचित पाहिले असेल की, परफ्यूम फवारल्याबरोबर त्याचा सुगंध आसपासच्या परिसरात पसरू लागतो. याचे एक कारण म्हणजे अल्कोहोल! कारण अल्कोहोल वेगाने बाष्पीभवन पावते, ज्यामुळे सुगंधी घटक हवेत पसरण्यास मदत होते. फवारणी केल्यावर, अत्तर अतिशय सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात बाहेर पडते, ज्यामुळे ते त्वचेवर सहज लावता येते. अल्कोहोल वेगाने सुकत असल्याने, ते सहसा त्वचेवर कोणताही तेलकट किंवा चिकट थर मागे ठेवत नाही.

अल्कोहोलशिवाय परफ्यूम बनवता येत नाहीत?

परफ्यूम हे अल्कोहोलशिवाय बनवता येतात. पण यात सुगंधी घटक मिसळण्याच्या आणि ते वापरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. यामुळे प्रत्येक प्रकारच्या सुगंधासाठी अल्कोहोल आवश्यक असते असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, स्प्रे-आधारित अनेक परफ्यूममध्ये अल्कोहोल एक उपयुक्त घटक ठरते. ते सुगंधाला एकजीव करण्यास, त्याला वापरण्यास सोपं करण्यासाठी आणि त्वचेवर लावल्यानंतर तो लवकर सुकण्यास मदत करते.

Follow Us
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...