AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adinath Kothare : पंढरपूरातील मंदिराच्या पायरीवर सापडलेलं लेकरू, आज बनला दिग्दर्शक; आदिनाथ कोठारेनं सांगितला प्रसंग

Adinath Kothare : आदिनाथ कोठारेनं नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक सचिन धोत्रे यांचा किस्सा सांगितला आहे.

Adinath Kothare : पंढरपूरातील मंदिराच्या पायरीवर सापडलेलं लेकरू, आज बनला दिग्दर्शक; आदिनाथ कोठारेनं सांगितला प्रसंग
| Updated on: Nov 25, 2026 | 3:55 PM
Share

चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी अनेकांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. काही जणांना या क्षेत्रात येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर काही जण आपल्या जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करत यश मिळवतात. अशाच एका जिद्दी दिग्दर्शकाची कहाणी अभिनेता आदिनाथ कोठारेनं सांगितली आहे. ‘मिरांडा वॉर्निंग’ या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं आदिनाथनं या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन धोत्रे यांच्या आयुष्यातील संघर्षाचा प्रवास उलगडला आहे. पंढरपूरच्या मंदिराच्या पायरीवर सापडलेल्या या बाळानं पुढे स्वतःच्या मेहनतीवर चित्रपट दिग्दर्शक होण्यापर्यंत मजल मारली.

आदिनाथ कोठारेनं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सचिन धोत्रे यांचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला की, तीन-चार वर्षांपूर्वी त्याची सचिन यांच्याशी ओळख झाली. सचिन हे पंढरपूरमधील एक साधे आणि अतिशय मेहनती व्यक्ती आहेत. त्यांचा आतापर्यंतचा संघर्ष पाहून आपण खूप प्रेरित झाल्याचं आदिनाथने सांगितलं. सचिन यांच्या आयुष्याबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला, ‘लय भारी’ चित्रपटात रितेश देशमुखनं साकारलेलं पात्र मंदिराच्या पायरीवर सापडतं आणि पुढे मोठं होतं. मात्र, सचिन धोत्रे यांच्या खऱ्या आयुष्यातही असाच काहीसा प्रसंग घडला आहे. ते मंदिराच्या पायरीवर सापडले होते. त्यानंतर एका संस्थेनं त्यांचा सांभाळ केला आणि त्यांचं संगोपन केलं.

सचिन यांनी पुढे स्वतःच्या मेहनतीवर आयुष्य घडवलं. चित्रपटसृष्टीतील तांत्रिक गोष्टी त्यांनी स्वतः शिकून घेतल्या. सुरुवातीला व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं. त्यानंतर म्युझिक व्हिडीओ, जाहिराती आणि डॉक्युमेंट्री तयार करण्यास सुरुवात केली. ‘गेट-टुगेदर’ हा चित्रपटही त्यांनी बनवला होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. आदिनाथ आणि सचिन यांची ओळखही एका वेगळ्या योगायोगामुळे झाली. आदिनाथनं 2016 मध्ये ‘विठू माऊली’ ही मालिका केली होती. त्यावेळी तो बराच काळ पंढरपूरमध्ये राहिला होता. तेव्हा त्यांची भेट झाली नव्हती. लॉकडाऊननंतर सचिन स्वतःहून आदिनाथला भेटायला आले. याबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला की, कदाचित विठ्ठलानेच त्यांची भेट घडवून आणली असावी. सचिन यांचं काम आणि त्यांचा प्रामाणिकपणा पाहून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली.

चित्रपटासाठी विकलं स्वतःचं घर

दरम्यान, याच मुलाखतीत दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनीदेखील त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितलं. चित्रपट बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. पहिला चित्रपट केवळ अनुभव मिळवण्यासाठी बनवला होता. मात्र, तो चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही. चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी काही फायनान्सर्सकडून पैसे घेतले होते. चित्रपट चालला नसला तरी दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांना मोठा निर्णय घ्यावा लागला.

सचिन यांनी सांगितलं की, फायनान्सर्सचे पैसे परत करण्यासाठी त्यांनी स्वतःचं घर विकलं. घर विकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी आपली देणी पूर्ण केली. त्यानंतर ‘गेट-टुगेदर’ हा चित्रपट केला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांना पुन्हा काम करण्याची प्रेरणा मिळाली. पंढरपूरमध्ये त्यांचा छोटासा व्यवसाय आहे. तोच व्यवसाय सांभाळत राहिलो असतो तर बरं झालं असतं, असंही कधीकधी वाटतं. मात्र, आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द असल्यामुळे ते आजवरचा प्रवास करू शकले.

सचिन धोत्रे दिग्दर्शित ‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट येत्या २७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारेसोबत जान्हवी किल्लेकर आणि पायल जाधव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Follow Us
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...