Amruta Khanvilkar: एवढा मनस्ताप व्हायचा म्हणून थेट FIR… खासगी आयुष्यात आलेल्या भयानक अनुभवावर अमृता खानविलकर स्पष्टच म्हणाली
Amruta Khanvilkar: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने एका मुलाखतीत खासगी आयुष्यात आलेल्या भयानक अनुभवाबद्दल सांगितलं आहे... यामुळे अभिनेत्रीला पोलिसांची मदत देखील घ्यावी लागली... यावर अमृता स्पष्टच म्हणाली आहे.

Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. फक्त मराठीच नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील अमृता हिने स्वतःची ओळख भक्कम केली आहे. अमृता फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, भन्नाट डान्समुळे देखील चर्चेत असते. अमृताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अशात प्रसिद्धी झोतात आल्यानंतर अमृता अनेक चांगल्या वाईट प्रसंगाचा देखील सामना करावा लागत आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं, एका अनोळखी नंबरवरून फोन आलेला आणि ती व्यक्ती इतकं घाणेरडं काहीतरी म्हणाली की, अमृताने थेट त्या व्यक्ती विरोधात FIR दाखल केली.
एका मुलाखतीत अमृता म्हणालेली, अतिशय घाणेरडी गोष्टा माझ्यासोबत घडली. मी एक शूट उरकून एका बाजूला बसले होते. कोणीतरी एक सतत फोन करत होतं. Unknown नंबर असल्यावर मी फोन घेत नाही. पण सतत कोणीतरी फोन करतंय, काही इमर्जेंसी असेल बघूया आणि को काही करी इतकं घाणेरडा बोलला.
भलताच कोणीतरी माणून होता. कोणाला अचानक नंबर मिळाल्यानंतर ते फोन करतात आणि फोन स्पीकरवर ठेवतात. हे खूप विचित्र आहे आणि आपल्याकडे हे असं केलं जातं. फोनवर बोलतात, ‘काय मॅडम कसं काय? मला भयंकर राग आला…कोण आहात तुम्ही? आणि पण जर थोडा आवाज चढवून बोललो, तर त्यांचं असं असतं ”एवढं काय झालं…’ पण ही वेळ आहे का? फोन करताय तर सांगा कोण आहात? तुमची ओळख काय आहे. मेसेज करा… अशा काही लोकांवर मी FIR दाखल केलेली आहेत. या लेव्हलला जाऊन बोलतात. आजच्या काळात महिलांच्या संरक्षणापुढे मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अमृता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘वाजले की बारा’, ‘चंद्रमुखी’ यांसारख्या गाण्यावर भन्नाट डान्स करत अमृताने चाहत्यांना देखील तिच्या तालावर ठेका धरण्यास भाग पाडलं. आजही कोणत्याही कार्यक्रमात अमृताची ही दोन गाणी नक्कीच वाजतात. एवढंच नाही तर, अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत अमृता हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. सोशल मीडियावर देखील अमृता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.