AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का, पोलीस ठाण्यात घेतली धाव, नेमकं काय घडलं ?

ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. दिग्दर्शक जाधव याने त्यांना डोंबिवलीतील प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चांगल्या परताव्याचे वचन दिले होते. सुरुवातीला काही पैसे दिल्यावर नंतर त्याने परतावा देणे बंद केले. तक्रारदारांनी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार नोंदवली असून, जाधवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का,  पोलीस ठाण्यात घेतली धाव, नेमकं काय घडलं ?
अभिनेत्री वर्षा उसगांवकर Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Mar 05, 2026 | 8:12 AM
Share

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री यांना मोठा धक्का बसला आहे. वर्षा उसगांवकर यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास 47 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली आहे. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तक्रार दाखल केली, ती मृणालीनी सुभाष जांभळे अभिनेत्री असून तिने मराठी रंगभूीमीवर तसेच चित्रपटात काम केलं आहे. संशयित आरोपी अविनाश जाधव यांच्याशी तिची व्यावसायिक ओळख होती. आपण चित्रपट निर्माता व बिल्डर असल्याचे जाधव यांनी सांगितलं होतं. डोंबिवली येथील प्रकल्पात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देईन, असं आश्वासन त्याने दिलं होतं. एवढंच नव्हे तर वर्षभरात मूळ रक्कम परत देईन, असा दावाही त्याने केल्याचं तक्रारीत नमूo करण्यात आलं.

त्यानुसार, नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये तक्रारदार मृणालिनी आणि तिच्या ओळखीने, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर, तसेच आणखी तीन जणांनी मिळून चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक जाधव यांच्याकडे केली.

थोडे पैसे दिले परत पण..

त्यानंतर सुरूवातीला जाधव यांनी परतावा म्हणून काही पैसे ( सुमारे साडेचार लाख) दिले. मात्र त्यानंतर काही काळाने त्याने परतावा, रिटर्न्स देणं बंजच केलं. मृणालिनी, वर्षा उसगावकर व इतरांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला, पैसे मागण्याचा प्रयत्न केला. पण जाधवने काही दाद दिली नाही, उलट तो मोबाईल क्रमांक आणि त्याचा पत्ता , दोन्ही बदलत राहिला.

अखेर तक्रारदारांनी डोंबिवली गाठली आणि जाधवला गाठत पैशांबद्दल विचारणा केली, जाब विचारला. त्यावर त्याने “ मी पैसे देणार नाही, जे काय करायचं ते करा” अशा अरेरावीच्या शब्दांत, उर्मट स्वरांत उत्तर दिलं, धमकी दिली, असा आरोप तक्रादारांनी केला आहे. आपली व सहकाऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व तक्रारदारांनी 26 फेब्रुवारी रोजी, दादर शिवाजी पार्क पोलिस ठाणं गाठलं आणि संशयित आरोपी जाधव याच्याविरोधात फिर्याद नोंदवली. याप्रकरणाचा पुढील तपास हाँ सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून ते कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...