Eco Friendly Ganesh Chaturthi 2021 | अभिनेता शरद केळकरने अवघ्या काही मिनिटांत साकारला इको-फ्रेंडली गणपती बाप्पा, पाहा खास व्हिडीओ

| Updated on: Sep 07, 2021 | 5:02 PM

शरद केळकर याने स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती बनवली आहे. इतकेच नव्हे तर, त्याने आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना देखील अशीच पर्यावरण पूरक मूर्ती आणण्याचा किंवा बनवण्याचा सल्ला दिला आहे.

Eco Friendly Ganesh Chaturthi 2021 | अभिनेता शरद केळकरने अवघ्या काही मिनिटांत साकारला इको-फ्रेंडली गणपती बाप्पा, पाहा खास व्हिडीओ
शरद केळकर
Follow us on

मुंबई : सगळ्यांचाच आवडता उत्सव अर्थात गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या दरम्यान आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील जोशात सुरु झाली आहे. याची खरेदी देखील सुरु झाली आहे. या सगळ्या माहोलात आता इको-फ्रेंडली बाप्पा (Eco Friendly Ganesh Chaturthi 2021) ही संकल्पना देखील जोर धरू लागलीय. इको-फ्रेंडली अर्थात पर्यावरण पूरक असलेली गणपती बाप्पाची मूर्ती. शाडूची माती, नारळाचा काथ्या किंवा साधी लाल माती त्यात झाडाच्या बिया अशा प्रकारे या मूर्ती तयार केल्या जातात. ‘तान्हाजी’, ‘लक्ष्मी’, ‘लई भारी’ फेम अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) याने अशीच गणपती बाप्पाची मूर्ती स्कारली आहे.

शरद केळकर याने स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती बनवली आहे. इतकेच नव्हे तर, त्याने आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना देखील अशीच पर्यावरण पूरक मूर्ती आणण्याचा किंवा बनवण्याचा सल्ला दिला आहे.

पाहा खास व्हिडीओ :

या व्हिडीओमध्ये त्याने मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती कशी आकार घेते हे दाखवले आहे. शरदच्या मदतीला तिथे एक मूर्तिकार देखील आहेत. त्याने हा व्हिडीओ एका युट्युब वाहिनीसाठी तयार केला आहे.

प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आवाहन

या खास व्हिडीओ सोबतच अभिनेता शरद केळकर याने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना एक आवाहनही केले आहे. पोस्ट लिहित तो म्हणाला, ‘या गणेश चतुर्थीला आपण पण प्रयत्न करा आणि आपल्या पर्यावरणाला साजेल अशी बप्पाची सळू मातीची इको फ्रेंडली मूर्ती आणा किंवा आपल्या घरीच अशी बनवा. या आपल्या एका पावलांनी आपण आपल्या पर्यावरणाला जोपासून ठेवायचे प्रयत्न करू शकतो. गणपती बप्पा मोरया!’

‘लक्ष्मी’तील भुमिकेमुळे शरद केळकर चर्चेत

‘लक्ष्मी’ या चित्रपटात शरद केळकर यांची खूप छोटी भूमिका आहे. पण, या 15 मिनिटांच्या लहानशा भूमिकेतही त्याची कामगिरी चाहत्यांना खूप आवडली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर शरद केळकर या मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटात एक लहानशी भूमिका असूनही या अभिनेत्याने बरीच प्रशंसा मिळवली आहे.

लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

‘लक्ष्मी’नंतर अभिनेता शरद केळकर आणखी 4 चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणच्या आगामी ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात शरद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘अवैध’ नावाच्या चित्रपटात तो फुटबॉल प्रशिक्षक साकारणार आहे. शहीद कपूरसह ‘जर्सी’ या चित्रपटातही शरद केळकर झळकणार आहे. या हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ‘अल्यान’ या तमिळ चित्रपटातून शरद केळकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

एकीकडे भावनिक गुंतागुंत, दुसरीकडे रूढी-प्रथांशी वाकडं, देशमुखांच्या घरात संजना पुन्हा एकदा ठरणार वादाचं निमित्त!  

‘जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पर होगा क्या असर…’, पाहा ‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा!