Sachin Pilgaonkar | ‘महागुरूं’नी घेतली कोरोनाची लस, सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार!

| Updated on: Mar 09, 2021 | 3:17 PM

मराठी मनोरंजन विश्वाचे महागुरु आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी देखील 8 मार्च रोजी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.

Sachin Pilgaonkar | ‘महागुरूं’नी घेतली कोरोनाची लस, सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार!
सचिन पिळगावकर
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे केवळ आपला देशच नाही तर अवघे विश्व हैराण झाले आहे. जगभरात कित्येक कोटी लोकांना या जीवघेण्या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात या विषाणूवर आणि त्याला प्रतिबंधित करण्याऱ्या लसीवर संशोधन सुरु असताना, भारताने बनवलेल्या 2 लसींना मान्यता मिळाल्याने देशभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. मराठी मनोरंजन विश्वाचे महागुरु आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी देखील 8 मार्च रोजी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला (Marathi Veteran actor Sachin Pilgaonkar takes first dosage of Corona vaccine).

लसीकरण करतानाचा ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या लसीकरण केंद्रातला फोटोसुध्दा सचिन पिळगावकरांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांच्या आईनेसुध्दा यावेळी करोना लस घेतल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच ही लस टोचणाऱ्या डॉक्टरांचे आणि तिथल्या मेडिकल स्टाफचेसुध्दा सचिन पिळगावकर यांनी आपल्या पोस्टमधून आभार मानले आहेत.

पाहा सचिन पिळगावकर यांची पोस्ट

बीकेसी लसीकरण केंद्रात घेतली लस

प्रेक्षकांचे लाडके ‘महागुरू’ अर्थात अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला ‘जम्बो कोव्हिड लसीकरण’ केंद्रात सोमवारी लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्यांची आई देखील त्यांच्या सोबत होती. त्यांनी देखील यावेळी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यावेळचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि रसिक प्रेक्षकांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. तसेच, काही चाहत्यांनी ते नेहमी तंदुरुस्त राहावे म्हणून शुभेच्छा देखील दिल्या आहेत (Marathi Veteran actor Sachin Pilgaonkar takes first dosage of Corona vaccine).

लॉकडाऊनच्या सुरुवातीस ‘महागुरुं’चे आवाहन

मार्च महिन्यात कोरोनाचा धोका वाढत असताना लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत होते. वारंवार आवाहन करूनसुद्धा काही लोक ऐकायला तयार नव्हते. अशा लोकांवर अभिनेते सचिन पिळगावकर संतापले होते. ‘थोडं तरी डोक्याचा वापर करा’, असं म्हणत त्यांनी बाहेर फिरणाऱ्या लोकांना सुनावले होते. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लोकांना आवाहनसुद्धा केले होते.

‘कोरोना प्रकरण वाढतंय. पंतप्रधान व मुख्यमंत्री आपल्या सर्वांना विनंती करतायत की, तुम्ही घरी राहा. पण काही लोक ऐकायलाच तयार नाहीत. मी असं म्हणत नाहीये की लोक घरात थांबले नाहीत. असंख्य लोक घरात थांबले आहेत, जे बुद्धिजीवी आहेत. पण काही लोक कोणाचंही ऐकत नाहीयेत. थोडं तरी डोक्याचा वापर करा. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांच्या कुटुंबियांना सोडून आपल्याकरिता रोज मेहनत करत आहेत. त्यांना कुटुंब नाही का? तरीही सगळं सोडून काम करतायत. थोडं तरी डोकं वापरा आणि घरीच थांबा,’ असे ते या व्हिडीओत म्हणाले होते.

(Marathi Veteran actor Sachin Pilgaonkar takes first dosage of Corona vaccine)

हेही वाचा :

Sanjay Leela Bhansali | संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रीकरण-प्रदर्शन पुन्हा लांबणीवर! 

Marathi Movie : प्रियदर्शन जाधवचं ‘लव्ह सुलभ’; चित्रीकरणाला सुरुवात