आधी अभिनेत्रीच्या कपड्यांवर ज्ञान पाजळलं, आता अल्पवयीन मुलीला…मौलाना पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

Maulana Muhammad Niyas Arrested : अभिनेत्रीच्या कपड्यांवर कमेंट करणारा मौलाना मुहम्मद नियास जुहरीला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

आधी अभिनेत्रीच्या कपड्यांवर ज्ञान पाजळलं, आता अल्पवयीन मुलीला...मौलाना पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
| Updated on: Nov 04, 2026 | 7:10 PM

केरळमधील इस्लामिक गुरू मुहम्मद नियास जुहरीला अटक करण्यात आली आहे. तो उस्ताद मुहम्मद नियास म्हणूनही ओळखला जातो. त्याच्यावर एका १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या कपड्यांवर टीका केलेली. त्यामुळे तो चर्चेत आलेला. दुबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान दाक्षिणात्य अभिनेत्री नाझरियाच्या कपड्यांवर टीका करणाऱ्या या मौलानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही अभिनेत्री तिच्या आगामी तमिळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी २८ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिनं पिवळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता.

नाझरिया ही अभिनेता फहाद फासिलची पत्नी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, हा मौलाना नाझरियाला एक मुस्लिम चित्रपट अभिनेत्री म्हणताना आणि तिचा पोशाख अयोग्य असल्याचं म्हणताना दिसत आहे. त्यानं अभिनेत्रीच्या पतीवर आणि तिच्या करिअरवरही टीका केली. इन्स्टाग्रामवर एक रील तयार करून, झुहारीनं अभिनेत्रीच्या धार्मिक आचरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मौलानानं नझरियाच्या कृतीचा निषेध केला. फक्त मुस्लिम अभिनेत्रींच्या कपड्यांवरच प्रश्नचिन्ह का उपस्थित केला जातो, तर पुरुष कलाकारांच्या धार्मिक कर्तव्यांबाबत चर्चा का होत नाही, असंही त्यानं म्हटलेलं.

Loading...

काय घडलं नेमकं?

नझरियाच्या कपड्यांवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आलेला झुहारी आता मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. या ३४ वर्षीय मौलानाला एका १६ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक करण्यात आली. झुहारी हा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील ओचिरा येथील हबीबिया इस्लामिक अकादमीचा संचालक आहे. पीडित मुलीच्या आजीनं आरोग्यासंबंधी आलेल्या अडचणींसाठी संपर्क साधलेला. मौलानानं कुटुंबाला सांगितलं की, आजीवर एका दुष्ट आत्म्याचा प्रभाव आहे आणि त्यातून तिला मुक्त करण्यासाठी शुद्धीकरण विधी करावा लागेल. पोलिसांचा दावा आहे की, या बहाण्यानं त्यानं कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि कथितरित्या अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना संशय आहे की, आरोपीनं इतर अल्पवयीन मुलींनाही टार्गेट केलं असावे. या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी आणि इतर पीडितांना ओळखण्यासाठी पोलीस अधिकारी त्याचा मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us