AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, पण मृत्यूनंतर कुटुंबाकडे मृतदेह नेण्यासाठी देखील नव्हते पैसे

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट हिट. अगदी लहान वयात असतानाच हातात घेतलेली कुटुंबाची जबाबदारी. पण मृत्यूनंतर देखील परिस्थिती होती खूपच बिकट.

ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, पण मृत्यूनंतर कुटुंबाकडे मृतदेह नेण्यासाठी देखील नव्हते पैसे
| Updated on: Oct 04, 2026 | 4:59 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पडद्यावर एखादी व्यक्तिरेखा साकारताना त्या इतक्या प्रभावीपणे अभिनय करायच्या की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किती दुःख आहे, याची चाहत्यांना कल्पनाही येत नसे. मात्र प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट अत्यंत वेदनादायी होता.

मीना कुमारी यांचं खरं नाव महजबीन बानो होतं. त्यांचे वडील अली बख्श यांनी त्यांना अवघ्या चार वर्षांच्या वयात चित्रपटसृष्टीत आणलं. 1939 मध्ये विजय भट्ट यांच्या ‘लेदरफेस’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना केवळ 25 रुपये मानधन मिळाल्याचं सांगितलं जातं. लहान वयातच अभिनय क्षेत्रात काम सुरू केल्यामुळे त्यांचं शिक्षणही अपूर्ण राहिलं.

लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी

कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मीना कुमारी यांना लहान वयापासूनच सातत्याने काम करावं लागलं. अवघ्या सहा-सात वर्षांच्या वयात त्या एका स्टुडिओमधून दुसऱ्या स्टुडिओमध्ये कामासाठी जात असल्याचं त्यांच्या जीवनावरील लिखाणात नमूद करण्यात आलं आहे. पुढे त्यांची कमाई कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार बनली.

मीना कुमारी आणि त्यांच्या वडिलांचं नातंही नेहमीच सोपं नव्हतं असं त्यांच्या चरित्रात नमूद करण्यात आलं आहे. लेखिका आणि पत्रकार विनोद मेहता यांच्या चरित्रानुसार, वडिलांच्या भीतीमुळे मीना कुमारी यांनी चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी गुपचूप विवाह केला होता.

‘बैजू बावरा’ने दिली खरी ओळख

1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाने मीना कुमारी यांना मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या. ‘पाकीजा’मधील त्यांची भूमिका आणि अभिनय आजही विशेष लक्षात आहे.

मीना कुमारी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपट दिले आणि मोठं नाव कमावलं. मात्र त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती असा दावा अनेक लेख आणि आठवणींमध्ये करण्यात आला आहे.

चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या कन्या रिंकी रॉय भट्टाचार्य यांनी ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, मीना कुमारी यांचं निधन झाल्यानंतर रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी नेण्यासाठी आवश्यक असलेले 3500 रुपयेही कुटुंबाकडे नव्हते, असा उल्लेख केला गेला आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात