भटक्या कुत्र्यासाठी 10 एकर जमीन द्यायला तयार… सुप्रसिद्ध गायकाची दर्यादिली, थेट कोर्टाकडेच मागणी; काय आहे भानगड?

गेल्या अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचे महिला आणि मुलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी एका अभिनेत्याने चक्क 10 एकर जमीन दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

भटक्या कुत्र्यासाठी 10 एकर जमीन द्यायला तयार... सुप्रसिद्ध गायकाची दर्यादिली, थेट कोर्टाकडेच मागणी; काय आहे भानगड?
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 12, 2026 | 2:40 PM

गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये अनेक महिला आणि लहान मुले जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर एका पंजाबी गायक आणि अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. ज्याने सर्वांना थक्क केलं असून त्याच्या निर्णयाचे अनेकजण स्वागत करताना दिसत आहेत. काय आहे तो निर्णय? जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या लहान मुले आणि महिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी आपली वेगवेगळी मते मांडली होती. अशातच आता याच मुद्द्यावर प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता मिका सिंगने सर्वोच्च न्यायालयाकडे एक महत्त्वाची विनंती करत मोठा निर्णय घेतला आहे.

मिका सिंगने रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर कोणताही अन्यायकारक भूमिका घेऊ नये अशी नम्र मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. यासोबतच त्याने भटक्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी 10 एकर जमीन दान करण्याची तयारी देखील दर्शवली आहे.

10 एकर जमीन दान करण्याचा निर्णय

मिका सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘भटक्या कुत्र्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या कोणत्याही निर्णयापासून दूर राहावे. माझ्याकडे पुरेशी जमीन उपलब्ध आहे आणि मी ती भटक्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी 10 एकर जमीन दान करण्यास तयार आहे.’

यामध्ये त्याने पुढे सांगितले की या जमिनीवर कुत्र्यांसाठी शेल्टर होम, वैद्यकीय सुविधा, अन्न-पाण्याची सोय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करता येईल. यामुळे भटक्या कुत्र्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता दोन्ही सुनिश्चित करता येईल.

सुप्रीम कोर्टाची भूमिका

मिका सिंगची ही मागणी अशा वेळी समोर आली आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रीट डॉग मैनेजमेंट हा विषय देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की त्यांनी भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. न्यायालयाचा उद्देश केवळ पशु जन्म नियंत्रण (ABC) नियम, 2023 यांची योग्य अंमलबजावणी व्हावी हाच आहे.

न्यायालयाच्या मते, कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ आणि महापालिका व स्थानिक प्रशासनाकडून नियमांची योग्य अंमलबजावणी न होणे यामुळेच न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय घेत याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.