AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..; मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक

अभिनेते मिलिंद गवळी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी शूटिंगदरम्यानचा एक किस्सासुद्धा सांगितला आहे.

जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..; मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक
Milind Gawali and Madhu KambikarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2026 | 1:32 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाने आणि नृत्यकलेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मधू कांबीकर यांच्या आठवणींना अभिनेते मिलिंद गवळी यांनी भावूक पोस्टद्वारे उजाळा दिला आहे. मधुबाईंनी तीन चित्रपटांत आपल्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत केवळ पडद्यावरच नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातही आई-मुलाचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो’

मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टची सुरुवात आयुष्याच्या अनिश्चिततेवर भाष्य करत केली. माणसाचा जन्म कधी, कुठे आणि कोणाच्या घरी होणार, हे त्याच्या हातात नसतं. त्याचप्रमाणे मृत्यू कधी आणि कुठे येणार, हेही कोणाला सांगता येत नाही. जन्म आणि मृत्यूच्या मधला काळ आपल्या हातात असतो, असं म्हटलं जातं; पण खरं तर जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याच संदर्भात त्यांनी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचीही आठवण काढली. रंगमंचावर सादरीकरण करताना अश्विनी एकबोटे यांचं निधन झालं होतं. मधू कांबीकर यांच्याबाबतीतही दहा वर्षांपूर्वी अशीच दुर्दैवी घटना घडली होती. एका कार्यक्रमात नृत्य करताना त्या चक्कर येऊन पडल्या आणि त्यानंतर कोमात गेल्या. जवळपास दशकभर त्या अंथरुणाला खिळून होत्या.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

‘याला जीवन ऐसे नाव. आपण जन्माला कधी, कुठे आणि कोणाकडे यायचं हे आपल्या हातात नसतं आणि आपलं मरण हे कधी कुठे केव्हा येणार हेही आपल्या हातात नसतं. असं म्हणतात की जन्म आणि मरणाच्या मधला जो काळ आहे तो आपल्या हातात असतो. पण खरंतर तोही आपल्या हातात नसतोच. मराठीतली एक उत्तम अभिनेत्री नृत्यांगना अश्विनी एकबोटे स्टेजवर परफॉर्म करता करता तिथेच कोसळली आणि एका क्षणात तिचा प्राण सुटला. परवा मराठीतल्या दिग्गज लावणी सम्राज्ञी, उत्तम अभिनेत्री मधू कांबीकर आपल्यातून निघून गेल्या. दहा वर्षांपूर्वी अशाच एका स्टेज शोमध्ये त्यांनी गिरकी घेतली आणि चक्कर येऊन त्या पडल्या आणि कोमामध्ये गेल्या,’ असं त्यांनी लिहिलं.

मधू कांबीकर यांच्याविषयी त्यांनी पुढे म्हटलं, ‘एक दशक, दहा वर्ष त्या अंथरुणाला खिळून होत्या, परवा त्यांचा प्राण सुटला. म्हणून म्हटलं जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं. मी आणि मधु कांबीकरांनी चार सिनेमे एकत्र केले. या चार सिनेमांपैकी तीन सिनेमात त्यांनी माझ्या आईची भूमिका केली. त्यामुळे त्यांच्याकडून आईचं प्रेम आणि वात्सल्यचा अनुभव मला आला होता. मुळातच त्या खूप प्रेमळ होत्या. दिसायला अतिशय सुंदर होत्या. खूपच घरंदाज दिसायच्या. ‘काळभैरव’, ‘मैत्री जीवाची’, आणि ‘महिमा खंडोबाचा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी माझ्या ‘आई’ची भूमिका केली होती. त्यामुळे आमच्यात खूपच प्रेमळ ‘आईमुला’चं नातं निर्माण झालं होतं. त्यानंतर ‘दुर्गा म्हणत्यात मला’ या चित्रपटांमध्ये कुलदीप पवारांबरोबर त्यांनी नकारात्मक भूमिका केली होती. ती सुद्धा त्यांनी खूपच भारी केली होती.’

‘एक दिवस आम्ही बारामतीजवळ ‘निरा’ या गावात शूटिंग करत होतो. त्यादिवशी मधुबाईंचा वाढदिवस होता. त्यांनी आम्हाला सांगितला नव्हतं, पण निर्माते, दिपाली सय्यद आणि बाकीचे युनिटमधले आम्ही सगळ्यांनी त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं. पुण्यावरून त्यांच्या सख्ख्या मुलाला प्रीतमला बोलून घेतलं. त्या इतक्या खुश झाला होता, इतका आनंद झाला होता त्यांना की.. अनेक दिवस त्या त्या दिवसाविषयी बोलत होत्या. परवा महेश टिळेकरांनी मला फोन करून त्यांच्या जाण्याची बातमी दिली. आम्ही दोघेही मुंबईत होतो, दहा-पंधरा मिनिटात आम्ही घर सोडलं आणि पुण्याला मधुबाईंच्या अंत्यसंस्काराला पोहोचलो. त्यांच्याविषयीच्या जुन्या आठवणी शेअर करत होतो. त्या इतक्या उत्तम नृत्यांगना होत्या. एके दिवशी त्या नृत्य करत असताना तबल्यावर साथ देणाऱ्या तब्बलजीचा एक ठेका चुकला आणि मधूबाई त्यांच्यावर खूप चिडल्या. इतकी वर्षे रियाज करून देखील ‘ठेका कसा चुकतो?’ , असा प्रश्न त्यांनी केला,’ अशी आठवण मिलिंद यांनी सांगितली.

Follow Us
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर