AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 वर्षे कोणीच खरेदी केला नाही हा चित्रपट, शेवटी निर्मात्यानेच केला प्रदर्शित, ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, नाव ऐकूनच..

मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट, ज्याला दोन वर्षे कोणीच खरेदी केलं नाही. शेवटी निर्मात्याने स्वत:च प्रदर्शित केला चित्रपट अन् ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर. आजही पाहण्यासाठी होते गर्दी.

2 वर्षे कोणीच खरेदी केला नाही हा चित्रपट, शेवटी निर्मात्यानेच केला प्रदर्शित, ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, नाव ऐकूनच..
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 03, 2026 | 1:48 PM
Share

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. त्यांच्या याच कारकिर्दीतील एक चित्रपट असा होता, जो 1983 मध्ये तयार झाला होता; मात्र तब्बल दोन वर्षे तो रिलीज होऊ शकला नाही. विशेष म्हणजे कोणताही निर्माता हा चित्रपट खरेदी करण्यास तयार नव्हता. अखेर निर्मात्याने स्वतःच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जे घडले ते आश्चर्यकारक होते.

हा चित्रपट म्हणजे ‘प्यार झुकता नहीं’. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरला. चित्रपटाचे बजेट 50 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते, तर त्याने तब्बल 4.50 कोटी रुपयांची कमाई केली.

दोन वर्षे चित्रपटाला मिळाला नाही खरेदीदार

‘प्यार झुकता नहीं’ हा चित्रपट 1983 मध्येच पूर्ण झाला होता. मात्र त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिमा प्रामुख्याने डान्स आणि अॅक्शनपटातील अभिनेत्याची होती. या चित्रपटात ते वेगळ्या भूमिकेत दिसत असल्याने वितरक आणि निर्मात्यांनी चित्रपट खरेदी करण्यात फारसा रस दाखवला नाही.

निर्माते के.सी. बोकाडिया यांनी जवळपास दोन वर्षे चित्रपटासाठी खरेदीदार मिळण्याची वाट पाहिली. अखेर कोणीही चित्रपट घेण्यास तयार नसल्याने त्यांनी स्वतःच तो प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 1985 मध्ये रिलीज झाल्यानंतर मात्र या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि तो रातोरात हिट ठरला.

या यशामुळे के.सी. बोकाडिया यांना मोठी ओळख मिळाली, तर दिग्दर्शक विजय सदाना यांचेही नाव चर्चेत आले. मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या करिअरलाही या चित्रपटामुळे मोठी चालना मिळाली.

लता मंगेशकरांच्या आवाजातील गाणी ठरली लोकप्रिय

‘प्यार झुकता नहीं’च्या यशामध्ये चित्रपटाच्या संगीताचाही मोठा वाटा होता. प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी चित्रपटाला संगीत दिले होते. चित्रपटातील अनेक गाणी लता मंगेशकर यांच्या आवाजात होती.

‘चाहे लाख तूफान आएं’, ‘तुमसे मिलकर ना जाने क्यों’, ‘हो दिलबर जानिया’ आणि ‘तुम्हें अपना साथी बनाने से पहले’ यांसारखी गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लता मंगेशकर यांच्यासोबत शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनीही आपल्या आवाजाने या गाण्यांना खास रंग दिला. चित्रपटातील संगीत आणि गाणी मिथुन चक्रवर्ती यांच्या लोकप्रियतेचा महत्त्वाचा भाग ठरली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका