डॉनच्या प्रेमात पडली अन् आयुष्याची झाली राखरांगोळी; अभिनेत्रीला जावं लागलं तुरुंगात, जेलमधील बाथरुममध्येच धक्कादायक..

Monica Bedi Bathroom CCTV Camera: अभिनेत्री मोनिका बेदीबद्दल अशा काही गोष्टी समोर आल्या होत्या ज्याने सर्वत्र खळबळ उडालेली.

डॉनच्या प्रेमात पडली अन् आयुष्याची झाली राखरांगोळी; अभिनेत्रीला जावं लागलं तुरुंगात, जेलमधील बाथरुममध्येच धक्कादायक..
| Updated on: Nov 26, 2026 | 11:43 AM

Monica Bedi News: बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी १९९५ मध्ये ‘सुरक्षा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘खिलौना’, ‘एक फूल तीन कांटे’, ‘तिरची टोपीवाले’, ‘जंजीर’, ‘कालीचरण’, ‘जानम समझा करो’, ‘जोडी नंबर वन’ आणि ‘प्यार इश्क और मोहब्बत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिकाला डिसेंबर २००६ ते जुलै २००७ या काळात भोपाळ तुरुंगात कैद करण्यात आले होते आणि जेव्हा तिने तुरुंग रक्षकावर गंभीर आरोप केले तेव्हा ती चर्चेत आली होती. एका वेबसाइटनुसार, तुरुंग अधिकारी पुरुषोत्तम सोमकुंवर यांना मोनिका बेदी आवडू लागली होती आणि त्यांनी बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते.

असे म्हटले जाते की तुरुंगात मोनिकाच्या आवडीनिवडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते. तिच्या आंघोळीसाठी तुरुंगात ‘डव्ह’ साबण पोहोचवला जात असे आणि तिच्या जेवणासाठी रेस्टॉरंटमधून जेवण मागवले जात असे. इतकेच नाही तर, तिला सौंदर्यप्रसाधनेही पाठवली जात होती. पुरुषोत्तम सोमकुंवर यांच्यावर याचा आरोप होता आणि यावरून मोठा गदारोळ झाला होता, जरी त्यांनी असे केल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.

Loading...

मोनिकाचे अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत प्रेमसंबंध होते. एका मुलाखतीत मोनिकाने खुलासा केला की, तिने अबूशी पहिल्यांदा १९९८ मध्ये फोनवर संवाद साधला होता, जेव्हा अबूने तिला दुबईतील एका शोमध्ये सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले होते. फोनवरच माझी त्याच्याशी मैत्री झाली. त्यावेळी तो वेगळं नाव वापरायचा आणि तो अबू सालेम आहे हे मला माहीत नव्हतं. जरी त्याने मला सांगितलं असतं की तो अबू सालेम आहे, तरी मला त्याबद्दल काहीच कळलं नसतं. मी फक्त दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याबद्दल ऐकलं होतं.

फोनवर बोलतानाच त्यांना एकमेकांबद्दल आवड निर्माण झाली. असं म्हटलं जातं की अबू सालेममुळेच मोनिकाला ‘जानम समझा करो’ आणि ‘जोडी नंबर वन’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. मोनिका अबूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि त्याने ती आपली पत्नी असल्याचा दावाही केला होता, पण त्या अभिनेत्रीने हे नाकारले. मोनिका अबूवर प्रेम करायची आणि त्याच्याशी लग्न करू इच्छित होती, पण तसं झालं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us