AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare: पुणे पोलिसांना जाग का येत नाही? सुषमा अंधारे यांचा खडा सवाल, कोर्ट परिसरातील हल्ल्याप्रकरणात काय दावा?

Sushma Andhare On Pune Crime: पुण्यात कोर्ट परिसरातच एका आरोपीवर गोळीबार आणि नंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेनंतर पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरे सेनेने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली.

Sushma Andhare: पुणे पोलिसांना जाग का येत नाही? सुषमा अंधारे यांचा खडा सवाल, कोर्ट परिसरातील हल्ल्याप्रकरणात काय दावा?
पुणे पोलिसांना जाग का येत नाही? सुषमा अंधारे यांचा खडा सवाल
| Updated on: Nov 26, 2026 | 11:32 AM
Share

Sushma Andhare On Pune Police: पुण्यातील कोर्ट परिसरातच एका आरोपीवर गोळीबार आणि नंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेने पुणे हादरले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याबाबत विरोधक सातत्याने चिंता व्यक्त करत आहेत. कालच्या घटनेला टोळीयुद्धाचीच झालर असल्याचा दावा करण्यात येत आहे. थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषद घेत ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारसह पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना खडा सवाल केला. तर गुन्हेगारी घटनांचा पाढाच वाचला.

पुण्याचा कोयतानगरीकडे प्रवास

काल पुण्यात थरारक अनुभला, कोयते वार करतात,१०८ नबर लागत नाही हे भयंकर आहे. अनेक लोक हात जोडून सांगत होते. पुण्याचे पोलिस आयुक्त गेले तीन वर्ष होते, सुसंस्कृत पुणे विद्याचे माहेरघर पुणे हे आता कोयता नगरी होण्यापर्यंत प्रवास सुरू आहे. पुणेकरांचं शहर क्राईम सिटी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्या आहेत, अशी टीका अंधारे यांनी केली.

हिंजवडीमध्ये ही घटना घडली त्याच सोबत कल्याणी नगर, आंदेकर कोमकर हत्याकांड असे अनेक घटना घडत आहे, कल्याणीनगर अपघात प्रकरणात तर पोलिसांनी आणि न्यायालयाने काय केलं सगळ्यांनाच माहिती आहे. स्वारगेटला सामूहिक बलात्कार घटना घडली.बीपीओ मध्ये खून घडतो. यावेळी गेले तीन वर्षातील पुण्यातील गुन्हेगारांची लिस्टच सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवली

पोलिसांच्या कारभारावर अंधारे यांची टीका

कोयते गँग आता कधी कधी येते असं डी जी म्हणतात. पुणे पोलिसांना एवढं घडून घेत जा का येत नाही हा माझा प्रश्न आहे? मी येरवडा कारागृहातील काही व्हिडिओ पोस्ट केले होते हे सर्वांना माहीत आहे, खराडी मध्ये कात्रीने खून झाला. या सगळ्या पुण्यातील घटना पाहता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतो. हे सगळं होत असताना न्यायालयाचा परिसर सुरक्षित नसेल तर अवघड आहे. या परिसरात अनेक लोक असतात, एवढ्या सगळ्या पुण्यात घटना घडत असतील तर ही भयंकर आहे

खासदार सुप्रिया सुळे यांनीही या गुन्हेगारी घटनांवर काही प्रश्न विचारले आहे. राज्यात पुणे गुन्ह्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, पुण्याचा देशात पाचवा आणि राज्यात पहिला क्रमांक लागतो, हे खासदार सांगत असतील तर हे भयंकर आहे. गुन्हेगार पकडतात, कोयते जप्त करतात मग तेवढे कोयते परत बाजारात कसे दिसतात. पिस्तूल एवढ्या सहजासहजी कसे उपलब्ध होतात, अमितेशकुमार यांनी हे सगळे कसे उपलब्ध होते हेही सांगितले पाहिजे, असे अंधारे म्हणाल्या.

भेसळयुक्त दारूमुळे चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याचं काय, दारू डीलरवर काय कारवाई केली काही डीलर ला वाचवण्यासाठी सरकार पक्षातील आमदार खासदारांनी पाठपुरावा केला आहे हे गंभीर आहे. या बातमी चालल्या थांबल्या यावर सरकार काहीच बोलत नाही. अटकेचे फक्त नाटक केले जाते. कल्याणी नगर पोर्श कार प्रकरणात काय झालं हे पण सांगितलं पाहिजे.

महिला सुरक्षित नाही, आयटी कर्मचारी सुरक्षित नाहीत कोर्टाच्या आवरत नागरिक सुरक्षित नाहीत, मंदार किवळे याला कोर्ट न्याय देईल, पण आता कोर्टावरचा विश्वासच लोकांचा उडवला आहे का? असे प्रश्न उपस्थित होतात. मुख्यमंत्री यांना लागलेली एटीकेटी अनेक ठिकाणी फेल ठरले आहेत, आरोपी गुन्हेगार यांना आपल्या पक्षात कसं घेता येईल असे चालले आहे, घोसाळकर, पुर्णेकर, देशमुख प्रकरणावरून समोर आले आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे, अशी मागणी अंधारे यांनी केली. अजित पवार पालकमंत्री पदावरून गेल्यानंतर गुंडा पुंडांना राजश्रय दिला जातो. सुनेत्रा पवार यांना माझा प्रश्न आहे अजून किती दिवस पुणेकर अमितेशकुमार यांच्या भरवशावर चालणार आहेत. गृहमंत्री संपूर्ण अपयशी आहेत . सातपुते मॅडम यांनी आतापर्यंत काय केलं केले, असा सवाल अंधारे यांनी विचारला.

Follow Us
राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार..
NCP : राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? सुप्रिया सुळेंच्या बैठकीला रोहित पवार उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत...
Baramati : बारामतीत थारचा थरार, वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून नेलं फरफटत; चालक फरार
पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : पुणे विद्येचं माहेरघर की गुंडांचं? संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राज
Shivsena : ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; जरांगेंचा खुलासा
Manoj Jarange : 500 कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप SIT कडे सुपूर्द; मनोज जरांगे पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश