AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिस्टर इंडिया’मधलं ते फेमस जॅकेट कुठून घेतलं विकत ? अनिल कपूर यांनी 39 वर्षांनी सांगितलं गुपित

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी 39 वर्षांनी 'मिस्टर इंडिया' चित्रपटातील आयकॉनिक जॅकेटचे रहस्य उघड केले. विशेष म्हणजे, ते जॅकेट त्यांना आजही फिट बसतं.

'मिस्टर इंडिया'मधलं ते फेमस जॅकेट कुठून घेतलं विकत ? अनिल कपूर यांनी 39 वर्षांनी सांगितलं गुपित
| Updated on: Oct 10, 2026 | 5:25 PM
Share

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर आपल्या अभिनयासोबतच फिटनेस आणि स्टाइलसाठीही ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट आले, मात्र ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली होती. आता तब्बल 39 वर्षांनंतर अनिल कपूर यांनी या चित्रपटाशी संबंधित एक खास आठवण शेअर केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात त्यांनी घातलेलं जॅकेट आजही त्यांनी जपून ठेवलं असून ते त्यांना अजूनही फिट बसतं. तसंच त्यांनी परिधान केलेल्या आयकॉनिक जॅकेटमागचं रहस्यही उलगडलं.

39 वर्षांपूर्वीच्या लूकमध्ये दिसला अभिनेता

अनिल कपूर यांनी ‘इंडिया के टॉप 1%’ या कार्यक्रमाच्या सेटवर ‘मिस्टर इंडिया’च्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते चित्रपटातील जुन्या लूकमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी त्याच काळातील जॅकेट, शर्ट आणि ट्राउझर्स परिधान केले होते. विशेष म्हणजे, इतकी वर्षे उलटूनही त्यांचे हे कपडे त्यांना व्यवस्थित बसत आहेत.आपल्या जुन्या लूकबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले, “माझा शर्ट अजूनही मला फिट बसतो, ट्राउझर्सही व्यवस्थित बसतात आणि जॅकेटसुद्धा. 39 वर्षांनंतरही सगळे कपडे मला फिट आहेत! टीमने म्हटलं होतं की, काश आम्हाला ‘मिस्टर इंडिया’चा कॉस्ट्यूम मिळाला असता. पण मी तो जपून ठेवला होता.” असं ते म्हमाले

राज कपूर यांनी केलं होतं कौतुक

या कार्यक्रमामागील संकल्पनेविषयी बोलताना अनिल कपूर यांनी समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांच्या मते, कोणतीही अपेक्षा न ठेवता देशाची सेवा करणारे लोक खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीत योगदान देत असतात. यावेळी त्यांनी ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचीही आठवण सांगितली. अनिल कपूर यांच्या म्हणण्यानुसार, ‘मिस्टर इंडिया’ पाहिल्यानंतर राज कपूर यांनीही चित्रपटातून मिळणाऱ्या संदेशाचं कौतुक केलं होतं. अनिल कपूर यांनी सांगितलं की, प्रत्येकजण आपल्या परीने ‘मिस्टर इंडिया’ बनू शकतो. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं आणि आपलं कर्तव्य निःस्वार्थ भावनेने पार पाडणं, हाच या विचारामागचा खरा अर्थ आहे.

मुंबईच्या चोर बाजारातून खरेदी केलं होतं जॅकेट

‘मिस्टर इंडिया’मधील जॅकेटमागची गोष्ट सांगताना अनिल कपूर यांनी एक रंजक खुलासा केला. हे जॅकेट त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध चोर बाजारातून खरेदी केलं होतं. आजही त्यांनी ते जपून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आठवण विशेष ठरली आहे. विशेष म्हणजे, अनिल कपूर यांनी या चित्रपटातील लूकप्रमाणेच आपले केसही लांब ठेवले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सेटवरील त्यांचा हा अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दिग्दर्शक शेखर कपूर यांचा ‘मिस्टर इंडिया’ हा सायन्स-फिक्शन सुपरहिरो चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा अरुण वर्मा या एका साध्या व्हायोलिन वादक आणि समाजसेवकाभोवती फिरते. त्याला एक असं उपकरण मिळतं, ज्याच्या मदतीने तो अदृश्य होऊ शकतो. या शक्तीचा वापर करून तो अन्यायाविरुद्ध लढतो आणि गरजू लोकांच्या मदतीला धावून जातो.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक