AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaktiman: रणवीरकडून 3 तास मनधरणी, ‘शक्तिमान’साठी हातात होता कोट्यवधींचा चेक; तरी मुकेश खन्ना यांनी दिला नकार

Mukesh Khanna: 'शक्तिमान' या चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंह जवळपास तीन तास मुकेश खन्ना यांच्यासमोर विनवणी करत होता. खुद्द मुकेश खन्ना यांनी याविषयीचा खुलासा केला. तरीही त्यांनी रणवीरला भूमिकेसाठी नकार दिला.

Shaktiman: रणवीरकडून 3 तास मनधरणी, 'शक्तिमान'साठी हातात होता कोट्यवधींचा चेक; तरी मुकेश खन्ना यांनी दिला नकार
Ranveer Singh and Mukesh KhannaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 31, 2026 | 9:48 AM
Share

‘शक्तिमान’ हा टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक आहे. अभिनेता मुकेश खन्ना यांनी साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. आता ‘शक्तीमान’वर मोठ्या पडद्यावर चित्रपट बनवण्याची चर्चा सुरू असताना, या भूमिकेसाठी रणवीर सिंहच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र मुकेश खन्ना यांनी रणवीरला शक्तिमानच्या भूमिकेत पाहण्यास स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे, रणवीरने त्यांना तब्बल तीन तास समजावण्याचा प्रयत्न केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी या भेटीचा किस्सा सांगितला. कोट्यवधींचं नुकसान झेलल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले मुकेश खन्ना?

सुभोजित घोष यांच्याशी संवाद साधताना मुकेश खन्ना म्हणाले, “रणवीरला शक्तिमानची भूमिका साकारण्यात खूप रस होता. तो तब्बल तीन तास माझ्यासोबत बसला आणि मला पटवून देण्यासाठी त्याने पूर्ण प्रयत्न केला. त्याला नकार देताना मला अपराधीपणा वाटत होतं. कारण शक्तिमानसाठी माझ्या मनात जो चेहरा होता, तो मला रणवीरमध्ये दिसला नाही. त्या तीन तासांमध्ये तो खूपच उत्साही होता. तो माझ्या शेजारी बसला आणि त्याने मला संपूर्ण कथा सांगितली. तो चक्क जमिनीवर बसला होता. तेवढ्यात मागून आदित्य चोप्रा आले. मी अचानक चकित झालो. याआधी मी इतका उत्साही आणि एनर्जेटिक माणूस पाहिला नव्हता. देव आनंद साहेबांनंतर रणवीर हा असा एकमेव अभिनेता आहे, ज्याच्यात मला इतकी ऊर्जा दिसली. तो एका जागी शांत बसूच शकत नव्हता. कधी इकडे फिरत होता, तर कधी तिकडे. एकदा तर तो टेबलवर चढून बसला. त्यानंतर पुन्हा दुसरीकडे जाऊन बसला.”

या मुलाखतीत पुढे मुकेश खन्ना म्हणाले, “यात काहीच शंका नाही की व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं तर मी एखाद्या मूर्ख माणसासारखं वागलो. माझ्या हातात कोट्यवधी रुपयांचा चेक होता. माझ्या ऑफिसमधल्या लोकांनीही मला सांगितलं, ‘सर, चेक घेऊन टाका. नंतर तुम्ही त्यांच्याशी भांडू शकता.’ पण मी त्यांना म्हणालो, ‘गप्प बसा. याबद्दल बोलू नका.’ मी तो चेक घेण्यास नकार दिला. माझ्या तत्त्वांपेक्षा महत्त्वाचा पैसा नाही. मी विचार केला की, समजा मी ते पैसे घेतले असते, तर आज जो काही वाद सुरू आहे, तो झाला असता का?”

कोट्यवधींचा चेक नाकारला

“मी तो चेक घेतला नाही, कारण माझा दुसरा चेक येणार होता, तोही मी थांबवला. पहिला चेक मी घेतला होता, पण दुसरा चेक मात्र थांबवला. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, ‘मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की, माझा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही शक्तिमान बनवाल.’ त्यावर त्यांनी अट ठेवली की, ‘सर, आम्ही तुमचा सल्ला नक्की घेऊ, पण काम आमच्या पद्धतीनेच करू.’ त्यावर मी म्हणालो, ‘ठीक आहे, मग असं होऊ शकत नाही.’ उद्या तुम्ही शक्तिमानला डिस्कोमध्ये नाचताना दाखवाल, त्यानंतर आणखी काही वेगळं दाखवाल. त्यामुळे मी शक्तिमानचा वारसा सुरक्षित ठेवला”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ट्रोल्सना उत्तर देताना मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “मी मूव्ह ऑन का करू? शक्तिमान मी बनवला आहे.” ‘शक्तिमान’ ही मालिका 1997 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत मुकेश खन्ना, वैष्णवी, सुरेंद्र पाल, टॉम अल्टर, नवाब शाह, किटु गिडवानी यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट