
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठी धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले… तर अनेकांनी त्यांच्यासोबत असलेल्या आठवणी सांगितल्या. निधनापूर्वी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तेव्हा अनेकांनी धर्मेंद्र यांना भेटण्याचा प्रयत्न देखील केला. अभिनेत्री मुमताज देखील धर्मंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. तेव्हा रुग्णालयात काय घडलं याबद्दल मुमताज यांनी सांगितलं आहे.
धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना भावूक झालेल्या मुमताज म्हणाल्या, ‘धर्मेंद्र आणि मी काही सिमेमांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि ते कायम एक उत्तम सह-कलाकार राहिले… उत्तम व्यक्ती… ज्याचं मन खरंच सोन्यासारखं होतं… सर्वांसोबत जुळवून घेणारे… शेवटपर्यंत त्यांचे सर्वांसोबत चांगले संबंध होते… आज देखील लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात आणि कायम करत राहतील… धर्मेंद्र एक असे व्यक्ती आहेत ज्यांना कोणी विसरुच शकणार नाही… त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही…’
मुमताज पुढे म्हणाल्या, ‘2021 मध्ये आमची शेवटची भेट झाली होती… ती एक शांत दुपार… मला नव्हतं माहिती की ती आमची शेवटची दुपार असेल… ती शेवटची वेळ होती जेव्हा आम्ही भेटलो होतो…’, सांगायचं झालं तर, मुमताज आणि धर्मेंद्र यांनी ‘झील के उस पार’, ‘लोफर’ यांरख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं.
धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असताना मुमताज यांनी त्यांना एकदा भेटण्याचा प्रयत्न केला. ‘मी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात देखील गेली होती. पण ते व्हेंटिलेटरवर होते… कोणालाच त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती… मी रुग्णालायात 30 मिनिटं थांबली… कोणी मला भेटू देईल याच आशेवर मी थांबली होती… पण आमची शेवटची भेट झालीच नाही.’ असं मुमताज म्हणाल्या.
मुमताज यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी दुःख देखील व्यक्त केलं. ‘मला त्याचं कुटुंब आणि हेमा यांच्यासाठी प्रचंड दुःख होत आहे… त्यांना हे नुकसान खूप जाणवत असेल. हेमा, धर्मेंद्र यांच्यावर खरोखर प्रेम करत होत्या.”