AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागार्जुन यांच्या वडिलांनी केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, घडलेली घटना सांगत अभिनेता म्हणाला…

Nagarjuna: 'बायकांसारखी वागणूक असल्यामुळे...', जेव्हा नागार्जुन यांच्या वडिलांनी केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न..., धक्कादायक घटना सांगत अभिनेता म्हणाला..., सध्या सर्वत्र अभिनेत्याने सांगितलेल्या घटनेची चर्चा...

नागार्जुन यांच्या वडिलांनी केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, घडलेली घटना सांगत अभिनेता म्हणाला...
| Updated on: Nov 23, 2024 | 2:05 PM
Share

Nagarjuna Father: झगमगत्या विश्वात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. पण त्या काही काळानंतर समोर येताच सर्वत्र मोठी खळबळ माजते. आता देखील असंच काही झालं आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेते नागार्जुन यांनी नुकताच झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये मोठा खुलासा केला आहे. नागार्जुन वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नागार्जुन यांचे वडील एएनआर यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. वडिलांना टोकाचा निर्णय का घेतला… यावर देखील नागार्जुन यांनी मौन सोडलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नागार्जुन यांनी वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘त्या काळात महिलांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणं… स्टेजवर सर्वांसमोर उभं राहणं… यासाठी परवानगी नव्हती. म्हणून माझ्या वडिलांनी महिलांची भूमिका करण्यास सुरुवात केली…’

नागार्जुन पुढे म्हणाले, ‘माझे वडील एक रेल्वे स्टेशनवर होते. जेव्हा ट्रेनमध्ये त्यांना प्रसिद्ध निर्माते घंटासला बलरामय्या यांनी पाहिलं आणि म्हणाले चांगले डोळे… चांगलं नाक आहे. तुम्ही अभिनय कराल? असा प्रश्न त्यांनी माझ्या वडिलांना विचारला… त्यानंतर काय झालं सर्वांना माहिती आहे…’

महिलांच्या भूमिका साकारल्यानंतर लोकं माझ्या वडिलांची खिल्ली उडवायचे. याच कारणामुळे अभिनेत्याच्या वडिलांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. ‘लोकं सतत खिल्ली उडवत असल्यामुळे वडील नाराज झाले होते. ते स्वतः म्हणाले होते की, मला आयुष्य संपवायचं आहे… ‘

‘खुद्द वडिलांनी मला सांगितलं होतं, कंबरेपर्यंत पाण्यात माझे वडील समुद्रात गेले होते. पण पाण्यात गेल्यानंतर त्यांनी काय विचार केला माहिती नाही… ते पुन्हा परतले… कठीण परिस्थित त्यांनी स्वतःला सावरलं.’ असं देखील नागार्जुन म्हणाले… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नागार्जुन यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.