...जेव्हा नेहा आई परीसाठी सॅण्टा होते

मुंबई : ख्रिसमस जवळ आला की, आपोआपच सेलिब्रेशनचे बेत आखले जातात. ख्रिसमस ट्री सजवण्यापासून ते अगदी सरप्राईज गिफ्टपर्यंत सगळ्याच गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करतात. ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईने असंच एक खास सरप्राईज तिच्या लाडक्या परीला दिलं. ख्रिसमसच्या रात्री सॅण्टा येऊन आपल्या आवडीचं गिफ्ट देतो ही गोष्ट परीला माहित होती. यावेळी मात्र तिने …

star pravah, …जेव्हा नेहा आई परीसाठी सॅण्टा होते

मुंबई : ख्रिसमस जवळ आला की, आपोआपच सेलिब्रेशनचे बेत आखले जातात. ख्रिसमस ट्री सजवण्यापासून ते अगदी सरप्राईज गिफ्टपर्यंत सगळ्याच गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करतात. ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईने असंच एक खास सरप्राईज तिच्या लाडक्या परीला दिलं. ख्रिसमसच्या रात्री सॅण्टा येऊन आपल्या आवडीचं गिफ्ट देतो ही गोष्ट परीला माहित होती. यावेळी मात्र तिने नेहा आईकडे सॅण्टाकडूनच गिफ्ट हवं अशी इच्छा व्यक्त केली. परीचा हट्ट पुरवण्यासाठी मग नेहा आईच सॅण्टा बनली आणि तिने परीला एक खास गिफ्ट दिलं. नेहा आईकडून मिळालेल्या या खास गिफ्टमुळे परीचा आनंद गगनात मावत नव्हता.

परी आणि नेहा आईमधील मॅजिक बॉण्ड सर्वांनाच माहितीये. ख्रिसमसच्या या मोक्यावर हा बॉण्ड आणखी घट्ट झालाय. ‘ख्रिसमस हा माझा सर्वात आवडता सण आहे. मला सरप्राईज गिफ्ट्स द्यायला खूप आवडतात. त्यामुळे यंदाचं गिफ्ट मी परीला दिलंय. परीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप सुखावणारा आहे.’ अशी भावना नेहाची भूमिका साकारणाऱ्या नुपूर परुळेकरने व्यक्त केली.

माय-लेकीमधला हा मॅजिक बॉण्ड अनुभवण्यासाठी न चुकता पाहा ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार रात्री 7.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *