आनंदाची बातमी, सोनं उतरलं, अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा आणि पूजेचा मुहूर्त जाणून घ्या

अक्षय तृतीयेला सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. सोनं घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेचा सोने खरेदीचा आणि पूजेचा मुहूर्त जाणून घ्या.

आनंदाची बातमी, सोनं उतरलं, अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा आणि पूजेचा मुहूर्त जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 11:58 PM

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्व आहे. हा दिवस हिंदु धर्मानुसार शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही कामाची सुरवात चांगल्या प्रकारे होते असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. शिवाय मुहूर्तावर सोन्या- चांदीवर डाग लावणे किंवा घर, वाहन किवा वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या दिवशी सोने खरेदी करणे म्हणजे लक्ष्मीचे वरदान प्राप्त होते असे बोलले जाते.

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसून आली होती. मात्र 10 मे ला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. सोन्याचा भाव 72,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यानंतर सोन्याच्या दरात 100 रुपयांपर्यंतची घसरण नोंदवण्यात आली. तर बुधवारी बाजारात सोन्याची किंमत 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती.

बाजारात सोन्याच्या किमतीतच घसरण झालेली नाही. तर चांदीच्या भावातही घसरण झालीये. चांदीच्या दरात प्रती किलोमागे 1500 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा बंद भाव 83,200 रुपये प्रति किलो झाला आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ आणि घट होत आहे. किमतीत वाढ आणि घट होण्याचे कारण हे अमेरिकेच्या महागाईमुळे आणि आकडेवारीवरची चिंता, फेडरल रिझर्व्हची व्याजदरांबाबतची भूमिका आणि डॉलरची मजबूती यांचाही किमतींवर परिणाम होत आहे असं सांगितलं जातंय.

अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त

जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5.13 पासून सुरु होणार आहे. हा मुहूर्त सकाळी 11.43 पर्यंत असणार आहे. जर सोने खरेदी करणार असाल तर त्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5.33 ते दुपारी 2.50 असणार आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.