IPL 2024 Points Table: पंजाब पराभवासह आऊट, आरसीबीच्या आशा कायम

IPL Points Table 2024 After 58th match : आरसीबीने पंजाब किंग्सचा 60 धावांनी धुव्वा उडवला. पंजाबचं या पराभवासह या हंगामातून पॅकअप झालंय. तर आरसीबीची आशा कायम आहे.

IPL 2024 Points Table: पंजाब पराभवासह आऊट, आरसीबीच्या आशा कायम
pbks vs rcb virat kohliImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 12:33 AM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 60 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने पंजाबला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबीसमोर पंजाबला 20 ओव्हरही नीट खेळता आलं नाही. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला 17 ओव्हरमध्ये 181 धावांवर गुंडाळलं. आरसीबीचा हा सलग चौथा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफमधील जर तरचं आव्हान कायम राखलं. तर पंजाब या पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडली. पंजाब मुंबईनंतर स्पर्धेतून बाहेर पडणारी दुसरी टीम ठरली आहे. तर आता 4 जागांसाठी 8 संघांमध्ये चुरस असणार आहे.

आरसीबी पाचव्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. आरसीबीच्या नावावर आता 12 सामन्यातील 5 विजयासह 10 गुण आहेत. आरसीबीचा नेट रनरेट हा 0.217 इतका आहे. तर पहिल्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स विराजमान आहे. केकेआरने 11 पैकी 8 सामने जिंकलेत. केकेआर 16 पॉइंट्स आणि 1.453 नेट रनरेटसह नंबर 1 आहे. तर राजस्थान रॉयल्सनेही 11 पैकी 8 सामने जिंकलेत. मात्र नेट रनरेटमुळे राजस्थान दुसऱ्या स्थानी आहे. हैदराबाद 7 विजयांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर चेन्नई 6 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

शुक्रवारी गुजरात विरुद्ध चेन्नई आमनेसामने

दरम्यान शुक्रवारी 10 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. चेन्नईच्या तुलनेत गुजरातला प्लेऑफची संधी कमी आहे, मात्र त्यानंतरही त्यांचं आव्हान कायम आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये सहज पोहचायचं असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातकडे चेन्नईला पराभूत करत त्यांचा खेळ बिघडवण्याची संधी आहे.त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात आता काय होतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटीकपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि विद्वत कवेरप्पा.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.