AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran President Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू

Iran President Death : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा अखेर शोध लागला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि अन्य अधिकारी असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये कोणी जिवंत असण्याचे संकेत नाहीयत असं इराणच्या सरकारी टेलीविजनने म्हटलं आहे.

Iran President Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू
Iran President ebrahim raisi Helicopter Crash site
| Updated on: May 20, 2024 | 9:43 AM
Share

इराणसाठी एक वाईट बातमी आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टपर दुर्घटनेत निधन झालं आहे. अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. काल संध्याकाळी या हेलिकॉप्टरचा हार्ड लँडिंग झाल्याच कळलं. हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी येत होत्या. इराणी मीडिया रेड क्रिसेंटनुसार, बचाव पथकाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं आहे. क्रॅश साइटवरुन फोटो समोर आलेत. या भीषण अपघातातून कोणी वाचण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. इराणच्या सरकारी टेलीविजनने सोमवार सांगितलं की, राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि अन्य अधिकारी असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये कोणी जिवंत असण्याचे संकेत नाहीयत.

रईसी अजरबैजान प्रांताच्या दौऱ्यावर गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर (375 मैल) उत्तर-पश्चिमेला अजरबैजान देशाच्या सीमेला लागून असलेल्या जुल्फा शहराजवळ झालीय. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.

इराणच्या हवामान विभागाचा अंदाज काय?

पाऊस आणि दाट धुक्यांमुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या. दुर्घटना घडली, त्या ठिकाणी हवामान खूप खराब होतं. इराणच्या हवामान विभागाने अजून हवामान बिघडण्याचा अंदाज वर्तवलाय. पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवलाय.

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध कसा लागला?

टर्कीच्या ड्रोनने या हेलिकॉप्टरचा शोध लावला. या ड्रोनने एक हीट सोर्स शोधून काढलं. तोच हेलिकॉप्टरचा ढिगारा होता. टर्कीच्या अधिकाऱ्यांनी तेहरानच्या वरिष्ठांना घटनास्थळाची माहिती दिली.

Follow Us
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...