Nana Patekar: ‘जाता जाता तो मला..’, नाना पाटेकरांबद्दल असं काय बोलून गेली तनुश्री दत्ता?
Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देखील अभिनेत्रीने हैराण करणारं वक्तव्य केलं आहे.

Nana Patekar: मराठी सिनेविश्व आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ता लाईमलाईटमध्ये आली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्यावर अनेक वादग्रस्त विधानं केली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल केलं, तर काहींनी तनुश्री हिचं समर्थन देखील केलं आहे. आता लाईव्ह येत तनुश्री दत्ता हिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. तनुश्री एक व्हिडीओ शेअर करत म्हणते, ‘मी सध्या उज्जेनमध्ये आहे. माझी टाईमलाईन आता सकारात्मक होत आहे. ट्विटरवर अनेकांनी माझं समर्थ केलं आहे. पण मी ट्विटरवर नाही. जे लोक मला ट्रोल करत आहेत, मला कळत नाही ते मला का ट्रिगर करत आहेत…’
पुढे तनुश्री दत्ता म्हणते, ‘ज्या व्यक्तीने माझं आयुष्य खराब रेलं आहे. ज्यानं गुंड पाठवून मला त्रास दिला आहे. माझं काम खराब केलं आहे. हा तो एकटा माणूस नव्हता… त्याच्यासोबत सैतानांची संपूर्ण टोळी होत… मी फक्त इव्हिल डेड म्हणाली, तर इतकं वातावरण पेटलं आहे. मी यासाठीच आवाज उठवला होता की, माध्यमांचे लक्ष केवळ त्या कार्यक्रमावर केंद्रित न राहता या मुद्द्याकडेही जावं.
सुदैवाने तसं काही घडलं नाही; तो कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. त्या अपशकुनी सावलीचा कार्यक्रमावर कोणताही परिणाम झाला नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानले. जाता – जाता देखील मला तो ट्रोल करुन गेला. काही लोकांची वृत्तीच अत्यंत नकारात्मक आणि द्वेषपूर्ण असते. इतरांना त्रास दिल्यामुळे कोणीही शक्तिशाली बनत नाही.’
‘काही लोक असं म्हणत आहेत की, कोणी गेल्यानंतर त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही. पण माझा प्रश्न असा आहे की, इतक्या वर्षांनंतर देखील, रावणाचा पुतळा का जाळला जातो, त्याला देखील श्रद्धांजली द्या… ज्यांची लंका हनुमानाने जाळली… माझ्या धर्माने मला असं शिकवलं आहे की, जिवंत असताना सैतान सैतानच असतो आणि मेल्यानंतर देखील…’
‘त्याने ज्या – ज्या लोकांसोबत वाईट केलं. त्यांची माफी न मागता, कुठे निघून गेला… त्याला तर नर्कात जायला पाहिजे…’, असं देखील तनुश्री म्हणाली, ज्यावर नाना पाटेकरांच्या चाहत्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तनुश्री हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.