AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांचं हे गाणं ऐकताना आजही डोळ्यात येते पाणी, 29 वर्षांपासून प्रेक्षकांचं आवडतं, 38 कोटी लोकांनी पाहिलं

29 वर्षांपूर्वीचं नाना पाटेकर यांचं हे गाणं ऐकताच आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात येते पाणी. रवीना टंडनसोबतची जोडी ठरली होती लक्षवेधी. 38 कोटींहून अधिक लोकांनी ऐकलं हे गाणं.

नाना पाटेकरांचं हे गाणं ऐकताना आजही डोळ्यात येते पाणी, 29 वर्षांपासून प्रेक्षकांचं आवडतं, 38 कोटी लोकांनी पाहिलं
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 10, 2026 | 2:18 PM
Share

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली आहे. गंभीर असो वा भावनिक, प्रत्येक भूमिका ते इतक्या ताकदीने साकारतात की त्यातील प्रसंग आणि संवाद आजही चाहत्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या कारकिर्दीतील असंच एक भावस्पर्शी गाणं तब्बल 29 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटातील ‘तेरा गम मेरा गम एक जैसा सनम’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. या गाण्यात नाना पाटेकर आणि रवीना टंडन यांची जोडी पाहायला मिळाली होती. नाना यांनी मुस्तफा तर रवीना यांनी कविता ही भूमिका साकारली होती.

गाण्याने प्रेक्षकांना लावलेलं वेड

या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील भावपूर्ण शब्द आणि मनाला स्पर्श करणारी चाल. आयुष्यातील दुःख, एकटेपणा आणि संघर्ष यांची जाणीव करून देणाऱ्या या गाण्याला हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी आपला आवाज दिला आहे. गीतकार आनंद बक्षी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून, राजेश रोशन आणि अमर हल्दीपूर यांनी संगीत दिले आहे.

चित्रपटातील मुस्तफा हा आपल्या भूतकाळातील आठवणींमुळे आतून एकटा पडलेला असतो. तर कविता ही आयुष्यातील कठीण परिस्थिती आणि समाजाच्या टोमण्यांचा सामना करत असते. अशा दोन दुःखी मनांची व्यथा या गाण्यातून व्यक्त होते. एकमेकांच्या वेदना समजून घेताना दोघेही एकमेकांचा आधार बनतात ही या गाण्याची खासियत आहे.

आजही हे गाणं ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यात येते पाणी

2015 मध्ये हे गाणं यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं होतं. दिलेल्या माहितीनुसार, या गाण्याला तब्बल 38 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटात नाना पाटेकर आणि रवीना टंडन यांच्यासोबत परेश रावल यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

आजही हे गाणं ऐकल्यावर अनेकांना जुन्या आठवणी आणि भावनिक क्षणांची आठवण होते. दमदार अभिनयासोबतच भावनांना स्पर्श करणाऱ्या अशा कलाकृतींमुळे नाना पाटेकर यांचा अभिनय आणि त्यांच्याशी जोडलेली गाणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.

Follow Us
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं