Nana Patekar: त्या जागेची भिती वाटते, तो दिसतो मला…, महेश मांजरेकर यांचं नाना पाटेकरांवर मोठं वक्तव्य

Nana Patekar: सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि चाहत्यांसोबत सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला. नानांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला असला तरी, महेश मांजरेकर मात्र खास मित्राला विसरु शकलेले नाहीत. त्यांनी आता नाना पाटेकर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Nana Patekar: त्या जागेची भिती वाटते, तो दिसतो मला..., महेश मांजरेकर यांचं नाना पाटेकरांवर मोठं वक्तव्य
Nana Patekar
| Updated on: Nov 17, 2026 | 2:16 PM

Nana Patekar: दिवंगत अभिनेने नाना पाटेकर यांनी जगाचा निरोप तर घेतला पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहते आणि मित्रांच्या मनात कायम राहतील. नाना पाटेकर यांनी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर, मोठ्या पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. म्हणून सर्वसामान्य माणसाला देखील असंच वाटलं की, कोणता सेलिब्रिटी नाही तर, आपल्याच जवळच्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या केल्या, मैत्रीचा एक किस्सा सांगितला..

महेश मांजरेकर यांनी सांगितल्यानुसार, नाना पाटेकर यांना मटण खूप आवडायचं. ते महेश मांजरेकर यांच्यासाठी देखील मटण बणवायचे… आज त्याच जागेची मांजरेकर यांना भिती वाटते, एवढंच आजही मांजरेकर यांना ती जागा दिसते जिथे नाना पाटेकर बसायचे… तर जाणून घ्या महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले.

Loading...

मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, ‘मटण खायला घालायला त्याला ( नाना पाटेकर) खूप आवडायचं, चुलीवर तो मटण शिजवायचा… चुलीवर मटण शिजत असताना बाजूला आम्ही बोलत बसायचो आणि तो मध्येच पाहायाला जायचा मटण किती शिजलं आहे. आता या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. मला तिकडे जायला देखील भीती वाटतेय. ती जागा मला दिसते मी कुठे बसायचो, तो कुठे बसायचा.. गप्पा मारत बसायचो आम्ही… ‘

पुढे मांजरेकर म्हणाले, ‘मध्येच उठायचा मटणामध्ये मिठ टाकायचा… हा त्याच्यासोबत फार वेगळा अनुभव होता. असं वाटायचं नाही की, आपण एखाद्या पॉश घरात गेलोय. जिथे ताटं व्यवस्थित लावलेली असतात. स्टिलच्या ताटात, तांब्याच्या ताटात आम्ही जेवायचो… असा नाना होता. त्याठिकाणी मला काचेच्या प्लेट दिसल्या असत्या तर असं वाटलंच नसतं मी नानाच्या घरी जेवतोय’

‘मटण त्याला खूप आवडायचं… आणि त्याने बनवलेल्या मटणला कोण वाईट बोलेल… तो वाईट बनवायचाच नाहीच. शुटिंगच्या वेळी देखील, तो काहीतरी बनवायचा आणि सगळ्यांना द्यायचा. अशी माणसं बनत नाहीत..’, असं म्हणत महेश मांजरेकर यांनी खास मित्रासाठी भावना व्यक्त केल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us