National Awards : मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, करण जौहर यांचाही गौरव

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. अभिनेता मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

National Awards : मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, करण जौहर यांचाही गौरव
| Updated on: Oct 08, 2024 | 7:16 PM

साऊथचा स्टार ऋषभ शेट्टी याला ‘कंतारा’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी देशाची राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना गौरविण्यात आले. करण जोहर, नीना गुप्ता आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. ऋषभ शेट्टीला ‘कंतारा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्याने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला- ‘मी खूप आनंदी आहे. आम्ही फक्त एक नाही तर दोन पुरस्कार जिंकले आहेत, ज्यामुळे हा क्षण आणखी आनंददायी होतो.

मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी म्हणाले की, कधीही हार मानू नका.

काय म्हणाला ऋषभ शेट्टी?

मीडियाशी बोलताना अभिनेता पुढे म्हणाला की- ‘प्रत्येक चित्रपटाचा प्रभाव असतो. समाजात बदल घडवून आणणारे किंवा प्रभाव पाडणारे चित्रपट बनवणे हा आमचा उद्देश आहे. मी प्रेक्षकांचे आभार मानतो. राष्ट्रीय पुरस्कार हा कलाकारासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

करण जोहरचा ही गौरव

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरलाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी त्याला AVGC (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

सूरज बडजात्या आणि नीना गुप्ता यांनाही पुरस्कार

सूरज बडजात्या यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. नीना गुप्ताला ‘ऊंचाई’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

‘गुलमोहर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

राहुल व्ही. चितैला यांच्या ‘गुलमोहर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. मल्याळम चित्रपट अट्टमला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्ममध्ये आणि आयनाला नॉन-फीचर फिल्म कॅटेगरीत राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

नित्या मेनन-मानसी पारेख यांनी हा पुरस्कार

नित्या मेनन हिला ‘थिरुचिरुबलम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मानसी पारेखला ‘कच्छ एक्सप्रेस’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.