मॉडेलचा लपून व्हिडीओ काढणाऱ्या अभिनेत्याला 20 दिवसांनी बेड्या

नवी मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता एजाज खानला मारहाणीप्रकरणी  वाशी पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी महिला मॉडेलचं चित्रिकरण करुन, अश्लील शेरेबाजी केल्याने आणि दिग्दर्शकाला मारहाण केल्याने एजाज खानविरोधात वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यापासून एजाज खान 20 दिवसांपासून फरार होता. मात्र नवी मुंबई पोलिसांनी एजाज खानला अटक करत सीबीडी …

मॉडेलचा लपून व्हिडीओ काढणाऱ्या अभिनेत्याला 20 दिवसांनी बेड्या

नवी मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता एजाज खानला मारहाणीप्रकरणी  वाशी पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी महिला मॉडेलचं चित्रिकरण करुन, अश्लील शेरेबाजी केल्याने आणि दिग्दर्शकाला मारहाण केल्याने एजाज खानविरोधात वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यापासून एजाज खान 20 दिवसांपासून फरार होता. मात्र नवी मुंबई पोलिसांनी एजाज खानला अटक करत सीबीडी बेलापूर कोर्टात हजर केले.

नेमकं काय प्रकरण आहे?

वाशी सिडको ऑडिटोरिअममध्ये 30 एप्रिल रोजी ‘इंडिया डिजाईन वीक’ नावाने फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. अभिनेता एजाज खान तिथे स्वतंत्र चेंजिंग रुम न दिल्याने वाद घालू लागला. त्यानंतर एजाज खानने चेंजिंग रुमजवळ महिला मॉडेलचे चित्रीकरण करुन, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली होती.

त्यानंतर एजाज खान याने दिग्दर्शक अब्दुल शिकूर खान आणि मॉडेल पंकज कुमार यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत दोन मुलं जखमी झाली होती.

आयोजिका दिपशिया चौधरी यांनी या सर्व प्रकरणाची वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेता एजाज खान आणि त्याच्या बाऊन्सरवर मॉडेलचं चित्रीकरण, मारहाण, शिवीगाळ आणि बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, असा गुन्हा दाखल केला होता.

कोण आहे एजाज खान?

अभिनेता एजाज खान हा हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता आहे. ‘रक्त चरित्र’, ‘अल्लाह के बंदे’ हे त्याचे सिनेमे विशेष गाजले. ‘रहे तेरा आशीर्वाद’, ‘कहानी हमारे महाभारत की’ यांसारख्या काही टीव्ही मालिकाही एजाज खानने केल्या आहेत. एजाज खान कायम वादात अडकणारा अभिनेता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *