Neetu Kapoor : ‘बडा अच्छा लगता है ना…’, नको तो अॅंगल घेणाऱ्या पापाराझींवर भडकल्या नीतू कपूर, विचारला थेट सवाल!
Neetu Kapoor takes a dig On Paps Back: बॉलिवूडमध्ये आता पापाराझी कल्चर वाढत आहे. याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम आहेत. पापाराझींनी अनेक सेलिब्रिटींचे बॅक शॉट घेतले आणि सोशल मीडियावर ते व्हायरल झाले. यावर आता नीतू कपूर भडकल्या आहेत. ज्यावर त्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे.

Neetu Kapoor takes a dig On Paps Back: सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यातल्या काही फोटो आणि व्हिडीओमुळे वाद होतात. सेलिब्रिटींचा नको तो अँगल घेऊन काढलेले फोटोंवर अभिनेता सलमान खान याने संताप व्यक्त केला. ‘बिग बॉस 20’ च्या विक एन्ड का वारमध्ये सलमान खान याने बॅक साईड फोटो आणि व्हिडीओ शूटवर प्रश्न उपस्थित करत, ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला. यावेळी भाईजानने पापाराझींवर टीका देखील केली. ज्यानंतर सोशल मीडियार अनेक सेलिब्रिटींना अभिनेत्याचं समर्थन केलं. आता अभिनेत्री नितू कपूर यांनी बॅक शॉटवर पापाराझींना चांगलंच सुनावलं आहे.
सध्या नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीतू कपूर यांना मुंबईत स्पॉट करण्यात आलं. व्हिडीओत दिसत असल्यानुसार, नीतू कपूर त्यांच्या कारमध्ये बसतात आणि पापाराझी त्यांचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात करतात. त्यानंतर कोणी एक म्हणतं, ‘मॅम बॅक की टर्न…’, यावर नीतू कपूर सुनावतात की, ‘आपको ये बडा अच्छा लगता है ना बैक?’ असं म्हणत कारमध्ये बसतात. व्हिडीओमध्ये त्या हसताना देखील दिसत आहेत, सध्या त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
View this post on Instagram
नेहा धुपियाच्या सपोर्टमध्ये सलमान खान…
सलमान खानने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. नेहा धूपियाने सर्वात आधी पापाराझींवर उघडपणे संताप व्यक्त करत म्हटलं होतं, ‘तुमच्यापैकी हे असे पाठीमागून शॉट कोण घेतं? हे बंद करा.’ नंतर ‘बिग बॉस 20’ मध्ये सलमान खानने तिला पाठिंबा दिला पापाराझींवर संताप व्यक्त केला होता. अभिनेत्यानं म्हटलं होतं, ‘जर कोणी असं करत असेल, तर त्याला फिरून जोरात कानशिलात मारा.’
सलमान खानने पापाराझींवर संताप व्यक्त केल्यानंतर सोशल मीडियावरही सेलिब्रिटींनी त्यांचं कौतुक केलं होतं आणि त्यांना पाठिंबा दिला होता. ‘द वन’च्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया शोमध्ये आले होते, तेव्हा तमन्नानेही सलमान खानचं कौतुक केलं होतं. याशिवाय, सलमानने एआय (AI) जनरेटेड डीपफेक व्हिडिओ आणि फोटोंवरही आपला संताप व्यक्त केला होता. डीपफेकच्या विरोधात अनेक सेलिब्रिटींनी कोर्टात देखील धाव घेतली आहे.
