AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Netflix ने लहान मुलांसाठी विनाशुल्क आनंद घेण्यासाठी ‘Playground app’केले लाँच, याबद्दल जाणून घ्या सविस्तर

Netflix, Netflix Launches Playground App, Children App, Launches Playground App, नेटफ्लिक्स, नेटफ्लिक्स अॅप, प्लेग्राउंड अॅप, नेटफ्लिक्स प्लेग्राउंड ॲप डाउनलोड, विनामूल्य अॅप लॉगिंन,

Netflix ने लहान मुलांसाठी विनाशुल्क आनंद घेण्यासाठी 'Playground app'केले लाँच, याबद्दल जाणून घ्या सविस्तर
| Edited By: | Updated on: Apr 08, 2026 | 4:09 PM
Share

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने Netflix Playground’ नावाचे एक खास गेमिंग ॲप लाँच केले आहे, जे पूर्णपणे सुरक्षित आणि जाहिरातमुक्त आहे. हे ॲप विशेषतः 8 वर्षांखालील मुलांसाठी तयार करण्यात आले आहे. या ॲप-मधील वापरकर्त्यांना खरेदी किंवा अतिरिक्त शुल्काचा कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीये. ही पालकांसाठी दिलासादायक बाब आहे, कारण आता ते कोणत्याही काळजीशिवाय आपल्या मुलांना गेम खेळायला देऊ शकतात. मुलांसाठी हे एक सुरक्षित आणि मनोरंजक व्यासपीठ बनवणे, हे कंपनीचे ध्येय आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या ॲपबद्दल अधिक जाणून घेऊयात.

लहान मुलांसाठी सुरक्षित आणि जाहिरातमुक्त गेमिंग प्लॅटफॉर्म

नेटफ्लिक्स प्लेग्राउंड हे खास लहान मुलांसाठी तयार केले आहे, जे पूर्णपणे जाहिरातमुक्त अनुभव देते. या ॲपमध्ये कोणतेही इन-ॲप खरेदी किंवा इतर शुल्क नाहीत, त्यामुळे पालकांना अतिरिक्त खर्चाची चिंता करण्याची गरज नाही. हे ॲप तुमच्या सध्याच्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसोबत काम करते, म्हणजेच वेगळे काहीही खरेदी करण्याची आवश्यकता नाही. कंपनीच्या मते हे ॲप मुलांची सर्जनशीलता आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी तयार केले आहे. तसेच ॲप त्यांच्या आवडत्या पात्रांसोबत एक मजेदार आणि सुरक्षित गेमिंग अनुभव देते, ज्यामुळे स्क्रीन टाइम उपयोगी बनतो.

लोकप्रिय पात्रांसह मजेदार खेळ आणि ऑफलाइन सपोर्ट

या ॲपमध्ये मुलांसाठी अनेक प्रकारच्या सोप्या आणि इंटरॅक्टिव्ह गेम दिले आहेत. जे त्यांच्या आवडत्या कॅरटून शोच्या आवडत्या कॅरेक्टरवर आधारित करून दिले आहेत. यामध्ये Peppa Pig, Sesame Street आणि Dr. Seuss यांच्यासारख्या आधारित गोष्टींवर गेम या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. खेळांमध्ये पजल्स, मेमरी गेम्स, रंग भरण्याची पाने आणि इतर‍ क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीचा समावेश आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व गेम बिना इंटरनेट कनेक्शनशिवाय खेळता येतात. याचा अर्थ मुले प्रवासात किंवा कमकुवत नेटवर्कवरही सहजपणे गेम खेळू शकतात.

अ‍ॅप कसे डाउनलोड करावे आणि वापरावे नेटफ्लिक्स प्लेग्राउंड ॲप डाउनलोड करा, आणि हे वापरणे देखील खूप सोपे आहे. वापरकर्ते ॲपल ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून ते त्यांच्या फोन किंवा टॅबलेटवर शोधून इन्स्टॉल करू शकतात. त्यानंतर ॲप उघडून त्यांच्या नेटफ्लिक्स खात्याद्वारे लॉग इन करा. एकदा लॉग इन झाल्यावर, एक साधा मुलांसाठी अनुकूल असा इंटरफेस दिसतो, जिथे गेम्सच्या रेंजनुसार प्रदर्शित केले जातात. पालकांसाठीही मूलभूत नियंत्रणे उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते गरजेनुसार स्टोरेज व्यवस्थापित करू शकतात आणि गेम्स काढून टाकू शकतात.

Follow Us
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....