AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये तुफान पाहिले जातायत हे 8 भारतीय सिनेमे अन् सीरिज; नंबर 1 वर सरोगसीने बाप झाल्याची कथा

आता अनेकांना चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्यासाठी तितका वेळ नाही. अशात सीरिज पाहणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत. त्यात भारतीय सिनेमांना अधिक पसंती मिळत आहे. पाकिस्तानात तर 8 भारतीय सिनेमे आणि सीरिज मोठ्या आवडीने पाहिले जात आहे... त्यामधील एका सिनेमाची कथा तर सरोगसीने बाप झाल्यालेल्या पुरुषाची कथा आहे...

पाकिस्तानमध्ये तुफान पाहिले जातायत हे 8 भारतीय सिनेमे अन् सीरिज; नंबर 1 वर सरोगसीने बाप झाल्याची कथा
| Updated on: Sep 28, 2026 | 9:45 AM
Share

रोजच्या धावपळीच्या जिवनात कुठेतरी निवांतपणा मिळावा यासाठी अनेक जण सिनेमे आणि सीरिज पाहतात. भारतीय सिनेमांना आणि सीरिजला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून प्रेम मिळत आहे. एवढंच नाही तर, पाकिस्तानात देखील भारतीय सिनेमे पाहिले जात आहे. तर असे 8 भारतीय सिनेमे आणि सीरि आहेत ज्या पाकिस्तानात पाहिल्या जातात. या 8 सीरिजच्या यादीत एक सिनेमा अव्वल स्थानी आहे, सिनेमाची कथा सरोगसीने बाप झाल्यालेल्या पुरुषाभोवती फिरत आहे. तर जाणून घ्या कोणते आहेत ते 8 सिनेमे आणि सीरिज…

‘विश्वनाथ एन्ड सन्स’ : ‘विश्वनाथ एन्ड सन्स’ सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित झाला असून, तामिळ – तेलुगू फॅमिली ड्रामा आहे. ‘विश्वनाथ एन्ड सन्स’ अशा एका श्रीमंत आणि ऐकट्या व्यक्तीची कथा आहे. प्रेमात धोका मिळाल्यानंतर त्याने लग्न केलं नाही. पण आईसाठी सरोगसीच्या मदतीने बाप झाला. पाकिस्तानात नेटफ्लिक्सवर नंबर 1 ला ट्रेन्ड करत आहे.

‘धमाल 4’ : यादीत धमाल 4 सिनेमा दुसऱ्या स्थानावर आहे. या कॉमेडी सिनेमात अजय देवगन, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि रवी किशन यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘इरुमुडी ‘: ‘इरुमुडी’ ही 2026 मध्ये प्रदर्शित झालेला एक ॲक्शन आणि इमोशनल ड्रामा सिनेमा आहे. यात रवी तेजा, बेबी नक्षत्र, प्रिया भवानी शंकर आणि साई कुमार यांसारखे कलाकार आहेत. सिनेमाची कथा त्रिनाध आणि त्याच्या मुलीभोवती फिरते. हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘लस्ट स्टोरीज 3’ : चौथ्या क्रमांकावर ‘लस्ट स्टोरीज 3’ आहे. 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही एक अँथोलॉजी सीरिज आहे, ज्यामध्ये प्रेम, नातेसंबंध, आणि मानवी भावनांशी संबंधित चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. या मालिकेत राधिका आपटे, कोकणा सेन शर्मा, विजय वर्मा, अली फजल, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांसारखे कलाकार पाहायला मिळत आहेत.

‘गांधारी’ : अभिनेत्री तापसी पन्नूचा हा ॲक्शन-थ्रिलर सिनेमा एका आईची कथा आहे, जी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असते. हा सिनेमा पाकिस्तानच्या नेटफ्लिक्स ट्रेंडिंग लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

‘अल्फा’ : ‘अल्फा’ हा 2026 मध्ये प्रदर्शित झालेला वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा ॲक्शन-थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि शर्वरी मुख्य भूमिकेत एका धोकादायक गुप्त मोहिमेला अंजाम देताना दिसत आहेत.

‘कॉकटेल 2 ‘: ‘कॉकटेल 2’ या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. सिनेमात शाहिद कपूर, कृती सेनॉन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. याची कथा तीन मित्रांच्या दीर्घकाळाच्या नात्याभोवती फिरते.

‘जीडीएन’ : ‘जीडीएन’ हा सिनेमा भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि संशोधक जी. डी. नायडू यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. यामध्ये आर. माधवनने मुख्य भूमिका साकारली आहे, जो त्यांच्या संघर्षाची गाथा दाखवतो. हा सिनेमा आठव्या क्रमांकावर आहे.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका