मला पीरियड्स आलेत…शरुला आली मासिक पाळी, जय घेतोय काळजी, सनई चौघडे मालिकेला रोमँटिक वळण
Sanai Choughade Zee Marathi Serial Promo : सनई चौघडे मालिका रंजन वळणावर पोहोचली आहे. प्रेक्षकांकडून मालिकेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. पेचात अडकलेले जय आणि शर्वरी एक प्लान बनवतात. ज्यामुळे मालिक एका वेगळाच वळणावर पोहोचली. मालिका धमाका करताना दिसतंय.

झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. झी मराठीवरील मालिका सनई चौघडे तूफान चर्चेत आहे. मालिकेत धक्कादायक वळण बघायला मिळतंय. प्रेक्षकांना मालिका तूफान आवडतंय. जय आणि शर्वरी यांच्यातील प्रेम खुलतंय. मालिकेत आसावरी (शर्वरीची बहीण) आणि गाैतम (जयचा भाऊ) यांचे लग्न व्हाव, याकरिता प्रयत्न करत आहेत. त्याकरिता त्यांच्याकडून अनेक गोष्टी केल्या जात आहेत. मात्र, जय आणि गाैतमच्या आईला तेजस्विनी खानोलकरला हे लग्न मान्य नाही. त्यांच्या या लग्नाकरिता मोठा विरोध आहे. त्याचे कारण म्हणजे आसावरीच्या कुटुंबाती स्थिती. खानोलकरांच्या स्टेटसला शोभणारे स्थळ नसल्याचे तिला वाटतंय.
जयसमोर त्या एक अट ठेवतात आणि गाैतम आसावरीच्या लग्नाला तयार होतात. मालिकेत आलेला ट्वीस्ट खूपच भन्नाट आहे. जेव्हा जय खानोलकर लग्न करेन, तेव्हाच त्या गौतम आणि आसावरीच्या लग्नासाठी परवानगी देतात. पेचात अडकलेले जय आणि शर्वरी एक प्लान बनवतात. ज्यामुळे मालिक एका वेगळाच वळणावर पोहोचली. जयची गर्लफ्रेंड बनवून रावीला आणतात.
दुसरीकडे रावी ही खानोलकरांची होणारी सून म्हणून मिरवताना दिसतंय. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. सध्या एक प्रोमो व्हायरल झाला. हा प्रोमो प्रेक्षकांना जबरदस्त आवडतोय. या प्रोमोत जय आणि शर्वरी ऑफिसमध्ये दिसत आहेत. प्रेक्षकांना हा प्रोमो तूफान आवडताना दिसतोय. जय हा हिटपॅड काढतो आणि शर्वरीला देतो. औषध आणि गोळ्या तिच्या हातात देतो. यावेळी एक पाण्याची बॉटलही दिसत आहे. शर्वरी औषध घेते आणि जयला म्हणते की, मिस्टर जय खानोलकर मी आजारी नाही.
View this post on Instagram
मला फक्त पिरियड्स आलेत. मला त्याची सवय आहे. त्यावर जय म्हणतो की, मला नाहीये ना सवय.. मी इंटरनेटवर वाचलं आणि मला जसे जमले तसे मी केले. बाकी काही नाही. तेवड्यात जय हा खिशातून एक चॉकलेट काढतो आणि शर्वरीला देतो. तुझी चिडचिड होणार घे… हे चॉकलेट म्हणत तिला चॉकलेट देतो. यावर शर्वरी चॉकलेट घेते आणि खाते चॉकलेटचा एक तुकडा ती जयला देखील देते. दोस्त की तरफ से म्हणत ती जयला चॉकलेट देते.
