AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: पत्नीला डावलून गर्लफ्रेंड कोमलसोबत का गेला लालबागच्या दर्शनाला? गोविंदा स्पष्टच म्हणाला, असेल आमचं अफेअर तर…

Govinda And Komal Rani: बॉलिवूडचा नंबर १ हिरो गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी, त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर कोमल राणी स्वर्णकरसोबत लालबागच्या राजाच्या दरबारात दर्शन घेण्यासाठी पोहोचला.

Govinda: पत्नीला डावलून गर्लफ्रेंड कोमलसोबत का गेला लालबागच्या दर्शनाला? गोविंदा स्पष्टच म्हणाला, असेल आमचं अफेअर तर...
| Updated on: Sep 25, 2026 | 7:34 AM
Share

बॉलिवूडचा नंबर १ हिरो गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी, त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर कोमल राणी स्वर्णकरसोबत लालबागच्या राजाच्या दरबारात दर्शन घेण्यासाठी पोहोचला. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, गोविंदाच्या भेटीच्या काही तास आधीच त्याची पत्नी सुनीता देखील एकटीच लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचली होती. आता गोविंदा पत्नीसह न जाता अभिनेत्री आणि कथित गर्लफ्रेंड कोमलसोबत लालबागचा का पोहोचला यावर अभिनेत्याने भाष्य केले आहे.

गोविंदाने त्याची ‘रूपा’ चित्रपटातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत लालबागच्या राजाच्या दरबारात दिलेली भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. २२ सप्टेंबर रोजी लालबादच्या चरणी ते दोघेही नतमस्मतक होण्यासाठी गेले होते. बाप्पाच्या दर्शनासोबतच, गोविंदाने अंतिम आरतीतही भाग घेतला. त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गोविंदाने सांगितले की, “लालबागच्या राजाला दिलेली त्याची भेट केवळ त्याच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्यासाठी होती. मी यापूर्वी करिश्मा कपूर आणि रविना टंडनसोबतही भेट दिली आहे. माझा विश्वास आहे की अशा प्रसंगांचा माझ्या चित्रपटांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी बऱ्याच काळानंतर कमबॅक करत आहे. म्हणून मी आर्शिवाद घेण्यासाठी गेलो होतो.”

गोविंदा म्हणाला की, “मला माझ्या कुटुंबापासून दूर करणे आणि समाजात माझी प्रतिमा मलीन करणे हा यामागील उद्देश होता. मी माझ्या आयुष्यात आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे आणि मी अविरतपणे काम करत आहे. हा कोणासाठी मनोरंजनाचा विषय असू नये, जरी असेल आमचे अफेअर तरी, मी काम करत आहे आणि व्यावसायिक संबंधही जपत आहे.” असं यावेळी गोविंदाने आर्वजून म्हटले आहे. गोविंदाचा रुपा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीच त्याच्या विषयी अनेक चर्चांना उधाण आल्यामुळे आता हा चित्रपट फ्लॉप ठरतो की ब्लॉकबस्टर हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा