
“महाभारत” मधील कर्णाचे पात्र घराघरात पोहोचवणारे अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंकज धीर यांनी बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाशी झुंज देत होते. असे म्हटले जाते की पंकज धीर आजारातून बरे झाले होते, परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरने ग्रासले होते आणि ते त्यातून बरे होऊ शकले नाहीत. पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली तसेच त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रियाही झाली होती. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांचे याच आजाराने निधन झाले. पंकज धीर यांचे 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले
पंकज यांचा मुलगा निकितिन देखील मोठा स्टार
दरम्यान पंकज यांचा मुलगा निकितिन देखील मोठा स्टार आहे. बॉलिवूडमध्ये त्याने अनेक चांगले चित्रपट केले आहे. मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.
निकितिन धीर बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. पण एका चित्रपटावेळी तो शाहरूख खानला भारी पडला होता. शाहरुख खानची त्याने झोप उडवली होती.
निकितिनच्या पात्रापुढे कुठेतरी शाहरूख खानलाही मागे राहावं लागलं.
‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपट सर्वांना माहितच असेल. चित्रपटात निकितिनने ‘थंगबली’ही खलनायकाची भूमिका केली होती. त्याचं हे पात्र लोकांनी फार डोक्यावर घेतलं होतं. त्याचं हे पात्र लोकांना एवढं आवडलं आणि प्रसिद्ध झालं होतं की त्यापुढे कुठेतरी शाहरूख खानलाही मागे राहावं लागलं.
एका भूमिकेमुळे त्याचं आयुष्यच बदललं
आपण निकितिन धीर आणि शाहरुख खान यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटात निकितिन धीरने ‘थंगाबली’ नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती. चेन्नई एक्सप्रेसमध्ये निकितिन धीर आणि शाहरुख खान यांच्यातील असंख्य अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात निकितिन धीरचे एक स्ट्राँग व्यक्तिमत्व दाखवण्यात आले आहे, जे पाहून शाहरुख खानही थरथर कापत होता. ‘चेन्नई एक्सप्रेस’ 2013 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रोहित शेट्टीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. पण थंगबली या भूमिकेला निकितिनने पूर्ण न्याय दिला होता आणि त्याचा प्रयत्न यशस्वी झाला तेव्हापासून त्याला खास ओळख मिळाली.
चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खान आणि निकितिन धीर यांच्यासोबत दीपिका पदुकोण देखील होती. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचे बजेट खूप मोठे होते, ज्यामुळे 2013 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनला. चित्रपटाचे बजेट अंदाजे 115 कोटी होते. चित्रपटाने थिएटरमध्ये 423 कोटी कमावले. चित्रपटाची गाणी देखील प्रचंड हिट झाली.