Nita Ambani : अंगावर लाल बनारसी, सोबतीला पारंपरिक दागिने, नीता अंबांनीच्या नव्या दीपावली लूकची चर्चा!

नुकत्याच एका दिवाळी उत्सवात त्या त्यांचे पती मुकेश अंबानी आणि सून श्लोका यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. यावेळी नीता आणि श्लोका या दोघींच्याही लूकचे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच भरभरून कौतुक केले.

Nita Ambani : अंगावर लाल बनारसी, सोबतीला पारंपरिक दागिने, नीता अंबांनीच्या नव्या दीपावली लूकची चर्चा!
nita ambani diwali party
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 04, 2026 | 10:13 PM

दिवाळीच्या दिवसांत अंबानी कुटुंबाचा थाट काही वेगळाच असतो. घरातील सण असो किंवा मोठा समारंभ,नीता अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कपडे,दागिने नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यंदाही रिलायन्स दिवाळी उत्सवात नीता अंबानी यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

या कार्यक्रमाला मुकेश अंबानी,नीता अंबानी आणि त्यांच्या मोठ्या सुनबाई श्लोका अंबानी उपस्थित होत्या. यावेळी नीता अंबानी यांनी नेसलेल्या लाल रंगाच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधले होते. नीता अंबानी यांनी लाल रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली होती. साडीवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले होते.पदरावर नारंगी रंगाची झलकही दिसत होती. या साडीला त्यांनी बुट्टीवर ब्लाऊजची जोड दिली होती.

Loading...

नीता अंबानी यांच्या साडीइतकेच त्यांच्या दागिन्यांचीही चर्चा झाली. त्यांनी गळ्यात रंगीबेरंगी हिरे आणि मोत्यांनी सजलेला जडाऊ हार घातला होता. त्यासोबत कानातले, हातात लाल बांगड्या आणि झुमक्यांच्या डिझाईनचे कडे घातले होते. तसेच कपाळावर लाल रंगाची टिकली आणि केसांमध्ये गजरा, साधा मेकअर अशा लूकमध्ये त्या दिसत होत्या. एकूणच पारंपरिक साडी आणि दागिन्यांमुळे त्याचा लूक उठून दिसत होता.

दुसरीकडे नीता अंबानीच्या मोठ्या सुनेने म्हणजेच श्लोका अंबानीने नेहमीच्या साडी किंवा लेंहग्यापेक्षा वेगळा एथनिक लूक निवडला होता. तिने जांभळ्या रंगाचा सुंदर भरतकाम केलेला ड्रेस परिधान केला होता. तिच्या कपड्यांवर बारीक हाताने केलेले भरतकाम आणि जरदोजीची नक्षी होती. या ड्रेससोबत तिने ओढणी देखील घेतली होती. दुपट्ट्यावरही सुंदर धाग्यांचे भरतकाम करण्यात आले होते. मोठे कानातले आणि साधा मेकअप अशा पद्धतीने तिने आपला लूक केला होता.

एकीकडे नीता अंबानी यांचा लाल बनारसी साडीतील पारंपरिक अंदाज, तर दुसरीकडे श्लोका हिचा जांभळ्या रंगातील हटके ड्रेस.. या सासू सुनेच्या जोडीने रिलायन्सच्या दिवाळी उत्सवात आपल्या पेहरावाने लक्ष वेधून घेतले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us