Ramayana : आधी कौतुक अन् आता काढले वाभाडे; ‘रामायण’ सिनेमावर नितीश भारद्वाज यांचा संताप, म्हणाले, एकही चांगली गोष्ट…

Nitish Bharadwaj On Ramayana : 'रामायण' सिनेमावर ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Ramayana : आधी कौतुक अन् आता काढले वाभाडे; रामायण सिनेमावर नितीश भारद्वाज यांचा संताप, म्हणाले, एकही चांगली गोष्ट...
| Updated on: Nov 10, 2026 | 6:41 PM

बी.आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय मालिका ‘महाभारत’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारलेल्या नितीश भारद्वाज यांनी रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या ट्रेलरचं कौतुक केलं होतं. त्यांनी चित्रपटाला ऑस्कर मिळवून देण्याचं वचनही दिलं होतं, पण आता चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. त्यांनी ‘रामायण’ पाहिला असून ते खूप निराश झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली. आपली निराशा व्यक्त करताना, नितीश यांनी निर्मात्यांवर यशच्या रावणाच्या भूमिकेतून महाकाव्याच्या नैतिक चौकटीला धक्का लावल्याचा आरोप केला. त्यांनी चित्रपटावर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे चुकीचं चित्रण केल्याचाही आरोप केला.

नितीश भारद्वाज यांची पोस्ट

Loading...

नितीश भारद्वाज यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ‘रामायण‘ चित्रपटावर टीका केली, तसंच नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल त्यांनी पूर्वी केलेली प्रशंसा मागे घेत असल्याचंही सांगितलं. नितीश भारद्वाज ‘रामायण‘ चित्रपटाबद्दल म्हणाले की, ‘रामायण ही केवळ एक कथा नाही, तर शाश्वत भारताच्या संस्कृती आणि आध्यात्माचा एक भाग आहे. या महाकाव्याची मूल्य आणि संदेशासाठी त्याचे नायक, नायिका आणि खलनायक अविभाज्य आहेत. त्यांची पात्रं आणि महत्त्व सहजपणे बदलता येणार नाही. धर्म आणि परंपरेचं रक्षण करण्यासाठी आणि प्रतिष्ठा स्थापित करण्यासाठी भगवान विष्णूंनी रामाचा अवतार घेतला. माझ्या मते, रावणाला एक अत्यंत उदार, सामाजिकदृष्ट्या न्यायप्रिय आणि निष्पक्ष व्यक्ती म्हणून चित्रित करून, हा चित्रपट रामायणाची नैतिक चौकट बदलतो आणि त्याच्या अवताराच्या मूळ उद्देशालाच कमी लेखतो.’

नितीश यांनी असंही म्हटलं की, भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स या महाकाव्याच्या मूळ मूल्यांची जागा घेऊ शकत नाहीत. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची प्रशंसा केलेल्या आपल्या पूर्वीच्या सोशल मीडिया पोस्ट्स हटवत असल्याचं सांगून त्यांनी चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली. अभिनेत्यानं लिहिलं की, ‘या चित्रपटामुळे मी खूप दुःखी आणि निराश झालो आहे. मी त्याबद्दलची माझी पूर्वीची पोस्ट मागे घेतो. मला या चित्रपटाबद्दल एकही चांगली गोष्ट सांगता येत नाही. भडक व्हीएफएक्स कधीही या महाकाव्याची मूळ मूल्यं, त्याची खोली आणि आध्यात्मिक सार यांची जागा घेऊ शकत नाहीत. माझ्या मते, हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमाचं प्रतिनिधित्व करण्यास पात्र नाही, कारण त्याची कथा भारताचा इतिहास, वारसा आणि मूळ आध्यात्मिक मूल्ये चुकीच्या पद्धतीनं मांडते.’

 

नितीश यांनी यापूर्वी चित्रपटाची भव्यता, व्हिज्युअल इफेक्ट्स, अभिनय आणि संगीताची प्रशंसा केली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच भारद्वाज यांनी चित्रपटाची भव्यता, व्हिज्युअल इफेक्ट्स, अभिनय आणि संगीताची प्रशंसा केली होती. त्यांनी दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा ​​यांची प्रशंसा केली आणि या मोठ्या चित्रपटाला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं भाकीत केलं होतं. मात्र, आता नितीश यांनी ‘रामायण‘ सिनेमावर नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us