AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India U-19 vs UAE U-19: पाकिस्तानकडून पराभवाचा घाव, यूएईवर विजयाचा डाव! भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री; आता कुणाशी भिडणार?

India vs UAE U19 Highlights: 19 वर्षांखालील आशिया कपमधील भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सामना अल अमेरत येथे खेळला गेला. विजयी संघ उपांत्य फेरी गाठणार होता. भारताने हा सामना 70 धावांनी जिंकला.

India U-19 vs UAE U-19: पाकिस्तानकडून पराभवाचा घाव, यूएईवर विजयाचा डाव! भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री; आता कुणाशी भिडणार?
India Beat UAE
| Updated on: Nov 10, 2026 | 6:34 PM
Share

19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय 19 वर्षांखालील संघाने शानदार कामगिरी करत युएई संघाला 70 धावांनी पराभूत केले. या दणदणीत विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मागील सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय युवा संघाने जबरदस्त जोश दाखवत सामन्याच्या प्रत्येक विभागात युएई संघावर मात केली.

प्रथम खेळताना संघाने 309 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर संयुक्त अरब अमिरातचा डाव 239 धावांवर संपुष्टात आला. उपांत्य फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानशी होईल. आता उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाशी होईल. चाहत्यांना आशा आहे की, जर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर भारतीय संघाला साखळी फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची एक मोठी संधी मिळेल.

सामन्यात युएई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय फलंदाजांविरुद्ध हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारताचे महान माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवागने भारतासाठी एक मॅरेथॉन आणि आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 168 चेंडूंमध्ये 160 धावांचे संस्मरणीय शतक झळकावले. त्याला व्ही. के. वनीतने उत्तम साथ दिली, ज्याने 69 चेंडूंमध्ये 67 धावांचे अर्धशतक केले.

या दोघांमुळे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 309 धावांचा डोंगर उभा केला, ज्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच युएईवर मानसिक दबाव आला. 310 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना युएईच्या 19 वर्षांखालील संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. कारण भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने धक्के दिले. युएईने आपली पहिली विकेट 36 धावांवर, दुसरी 61 धावांवर आणि तिसरी 86 धावांवर गमावली.

एकूण 141 धावांवर सहा महत्त्वाचे फलंदाज गमावल्यामुळे युएईचा संघ मोठ्या संकटात सापडला होता. 50 षटकांत 239 धावांवर त्यांचा संघ ऑलआऊट झाला. युएईच्या आघाडीच्या फलंदाजांकडे भारतीय गोलंदाजांच्या अचूक टप्पा आणि दिशेला उत्तर नव्हते आणि सामना पूर्णपणे भारताच्या हातात होता. यानंतर आता भारतीय संघ अफगाणिस्तान सोबत भिडणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?