Nushrratt Bharuccha : नुसरतची प्रकृती चिंताजनक, भविष्यात आधाराशिवाय उभं राहणं कठीण, मोठी अपडेट समोर
Nushrratt Bharuccha : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा हिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. आता अभिनेत्री आधाराशिवाय स्वतःच्या पायांवर उभी देखील राहू शकत नाही... असं सांगण्यात येत आहे... जाणून घ्या तिच्याबद्दल मोठी अपडेट...

Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. बाली याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या नुसरत हिचा अपघात झाल्यानंतर तिला उपचारासाठी मुंबईच आणलं आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. नुसरतच्या पाठीच्या कण्यावर आता मुंबईत शस्त्रक्रिया केली जाईल, म्हणूनच अभिनेत्रीला विमानानं मुंबईला आणण्यात आलं. आता देखील सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं सांगाण्यात आलं आहे की, नुसरत आता भविष्यात आधाराशिवाय स्वतःच्या पायाव देखील उभी राहू शकत नाही.
अभिजीत कुमार नावाच्या एक्स अकाउंटवर अभिनेत्रीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर लिहलं आहे की, आयुष्य खरोखरच अनपेक्षित आहे… नुसरत भरुचा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बालीच्या सहलीवर गेली होती. तेव्हा छतावर असताना तिचा पाय घसरला आणि मोठी दुर्घटना घडली. तिच्या मणक्याला दुखापत झाली आहे… आता हे जवळपास निश्चित झालं आहे की, ती कदाचित कधीही कोणाच्याही आधारशिवाय स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नाही.
Life is truly unpredictable.🥺💔
– Meet Nushrratt Bharuccha, a 41-year-old Indian actress. – She was on a trip to Bali for a holiday. – During her trip, she was on the roof when her leg slipped. – She lost her balance and met with an accident. – She suffered a spinal fracture. – Now, it’s almost confirmed that she may never be able to stand on her own legs without support. – She has now been brought to Mumbai for spine surgery. – Once, she was everyone’s dream girl. Today, she’s fighting a battle no one expected.
That’s why we say, spend as much time with your family as you can, because nobody knows when God will call you.💯
Please keep her in your prayers. 🙏
— Abhishek Kumar (@Abhishek060722) October 2, 2026
अभिनेत्रीला आता स्पाइन सर्जरीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. एकेकाळी ती प्रत्येकाची ‘ड्रीम गर्ल’ होती. आज ती असा लढा देत आहे ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती…. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यावर कमेंट करत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
नुसरत हिच्या टीमने देखील तिच्या अभिनेत्रीबद्दल मोठी माहिती दिली आहे. मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर यातून बाहेर येण्यासाठी नुसरत हिला विश्रांतीची गरज भासणार आहे. याचा तिच्या भविष्यातीली कामावर परिणाम होईल… पण शस्त्रक्रिया कधी केली जाईल याबद्दल कोणतीच अपडेट समोर आली नाही.
नुसरत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘कल किसने देखा’, ‘ताजमहाल’ आणि ‘लव्ह सेक्स और धोखा’, ‘प्यार का पंचनाना’, ‘अकेली’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
