Oscar Awards 2019 Live: भारतीय सिनेनिर्माते गुणीत मोगांना ऑस्कर

Oscar Awards 2019 Live: कॅलिफोर्निया: हॉलिवूडमध्ये 91 व्या ऑस्कर अॅवॉर्ड्सची धामधूम सुरु आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. ऑस्कर सोहळ्यासाठी रेड कार्पेटवर दिग्गज कलाकारांचा जलवा पाहायला मिळाले. फिल्मी दुनियेसाठी ऑस्कर हा सर्वात मोठा सोहळा असतो. ऑस्कर जिंकणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांसह संबंधित सर्वांचं नाव इतिहासात नोंदलं जातं. यंदा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा ऑस्कर […]

Oscar Awards 2019 Live: भारतीय सिनेनिर्माते गुणीत मोगांना ऑस्कर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

Oscar Awards 2019 Live: कॅलिफोर्निया: हॉलिवूडमध्ये 91 व्या ऑस्कर अॅवॉर्ड्सची धामधूम सुरु आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. ऑस्कर सोहळ्यासाठी रेड कार्पेटवर दिग्गज कलाकारांचा जलवा पाहायला मिळाले. फिल्मी दुनियेसाठी ऑस्कर हा सर्वात मोठा सोहळा असतो. ऑस्कर जिंकणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांसह संबंधित सर्वांचं नाव इतिहासात नोंदलं जातं.

यंदा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा ऑस्कर पुरस्कार अभिनेता रॅमी मॅलेकने (Rami Malek) पटकावला.  बोहेमिन ऱ्हॅप्सडी या सिनेमातील अभिनयासाठी रॅमीला गौरवण्यात आलं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑलिव्हिया कोलमनला ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलं. द फेव्हरिट (The Favourite ) सिनेमासाठी तिने आपलं पहिलं वहिलं ऑस्कर पटकावलं.

तर सर्वोत्तम चित्रपटाचा मान ग्रीन बुकला मिळाला. दुसरीकडे रोमा सिनेमासाठी दिग्दर्शक अल्फॉन्सो क्वारॉन यांनी ऑस्कर जिंकला.

रोमा या सिनेमाला परदेशी भाषा या प्रकारात ऑस्कर मिळाला. या शर्यतीत कॅपरनॉम (लेबनान), कोल्ड वॉर (पोलंड), नेवर लूक अवे (जर्मनी), ऑपलिफ्टर्स (जपान) यासारखे सिनेमे होते. रोमा हा सिनेमा अल्फान्सो कुआरोन यांनी दिग्दर्शित केला. मेक्सिकोत घालवलेले दिवस त्यांनी या सिनेमातून दाखवले आहेत. महत्वाचं म्हणजे हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट आहे.

भारतीय सिनेनिर्माते गुणीत मोगां यांच्या ‘पिरेड. एण्ड ऑफ सेन्टेन्स’ या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

Oscar Awards 2019 Live

सर्वोत्कृष्ट सिनेमा- ग्रीन बुक Green Book

बेस्ट फिल्म कॅटेगरीमध्ये 8 सिनेमे शर्यतीत होते. यामध्ये ब्लॅक पँथर, BlackKkclansman, Bohemian Rhapsody, The Favourite, Green Book, Roma, A Star Is Born, Vice यांचा समावेश होता. मात्र ग्रीन बुकने या सर्वांना मागे टाकत सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रोमा सिनेमासाठी दिग्दर्शक अल्फॉन्सो क्वारॉन (Alfonso Cuaron) यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ऑलिव्हिया कोलमन – द फेव्हरिट

द फेव्हरिट (The Favourite ) सिनेमाची अभिनेत्री ऑलिव्हिया कोलमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कार. ऑलिव्हियाने पटकावलेला पहिलाच ऑस्कर पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता – रॅमी मॅलेक – बोहेमिन ऱ्हॅप्सडी

Bohemian Rhapsody या सिनेमासाठी Rami Malek ला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार. रॅमीला Golden Globes 2019 मध्येही सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार

सर्वोत्कृष्ट गाणं – शॅलो – अ स्टार इज बॉर्न

सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा – ब्लॅकक्लॅन्समन

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – ब्लॅक पँथर

सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा – ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – स्किन

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – फर्स्ट मॅन

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी  (लघुपट) – पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – बाव

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर – स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – महेरशाला अली – ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट संकलन – बोहेमिन ऱ्हॅप्सडी

सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) – रोमा

सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – बोहेमिन ऱ्हॅप्सडी

सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – बोहेमिन ऱ्हॅप्सडी

सर्वोत्कृष्ट छायांकन – अल्फॉन्सो क्वारॉन – रोमा

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- हॅना बेकलर – ब्लॅक पँथर

सर्वोत्कृष्ट वेशभूषा – रुथ कार्टर – ब्लॅक पँथर

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा – व्हाईस

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर – फ्री सोलो

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – रेजिना किंग – इफ बील स्ट्रीट कुड टॉक

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.