AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTT Release : सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर फुल धमाल; ‘सैयारा’ ते ‘कुली’.. ब्लॉकबस्टर चित्रपट होणार स्ट्रीम

सप्टेंबरमध्ये ओटीटीवर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये काही ब्लॉकबस्टर चित्रपटांचाही समावेश आहे. वीकेंडला ओटीटीवर काय पहायचं, हा विचार करत असाल तर एकदा या ओटीटी रिलिजची यादी पाहून घ्या..

OTT Release : सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर फुल धमाल; 'सैयारा' ते 'कुली'.. ब्लॉकबस्टर चित्रपट होणार स्ट्रीम
सैयारा, कुलीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2025 | 10:24 AM
Share

सध्या ओटीटीचा जमाना असल्याने दर आठवड्याला आणि महिन्याला कोणकोणते नवीन चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम होणार आहेत, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. सप्टेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये स्टार डेब्युपासून अॅक्शन थ्रिलरपर्यंत अनेक प्रकारांचा समावेश आहे. म्हणजेच थिएटरमध्ये पाहू न शकलेले ब्लॉकबस्टर चित्रपट या महिन्यात प्रेक्षक त्यांच्या घरबसल्या पाहू शकणार आहेत. यात पाच मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.

सैयारा मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेता अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असून 2025 या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. अहान आणि अनीतची फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि त्यातील गाणीसुद्धा हिट ठरली आहेत. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येत्या 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मालिक- या चित्रपटाचं दिग्दर्शन पुलकितने केलं असून कुमार तौरानी आणि जय शेवक्रमणी हे त्याचे निर्माते आहेत. या अॅक्शन थ्रिलरमध्ये राजकुमार राव, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि मानुषी छिल्लर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने थिएटरमध्ये विशेष कामगिरी केली नाही. परंतु ओटीटीवर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट अॅमझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

आंखों की गुस्ताखियाँ- या रोमँटिक ड्रामामध्ये विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहे. संजय कपूरची मुलगी शनायाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. संतोष सिंह दिग्दर्शित या चित्रपटालाही थिएटरमध्ये अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता 5 सप्टेंबरपासून झी5 वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

इन्स्पेक्टर झेंडे- मराठमोठा अभिनेता चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित आणि लिखित या कॉमेडी थ्रिलरमध्ये मनोज बाजपेयीने इन्स्पेक्टर मधुकर झेंडेची भूमिका साकारली आहे. तर जिम सर्भ कार्ल भोजरातच्या भूमिकेत आहे. कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजवर आधारित ही भूमिका आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

कुली- लोकेश कनगराज लिखित आणि दिग्दर्शित ‘कुली’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहिर, सत्यराज, उपेंद्र आणि रचिता राम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर आमिर खान आणि पूजा हेगडे यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले आहेत. येत्या 11 सप्टेंबर रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा