AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara : ‘सैय्यारा’ची एवढी क्रेझ का? या 5 कारणांमुळे चित्रपट ठरतोय सुपरहिट

18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'सैय्यारा' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा या नव्या कलाकारांनी कमाल केली आहे.

Saiyaara : 'सैय्यारा'ची एवढी क्रेझ का? या 5 कारणांमुळे चित्रपट ठरतोय सुपरहिट
अहान पांडे, अनित पड्डाImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2025 | 1:32 PM
Share

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सैय्यारा’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये विशेष क्रेझ पहायला मिळतेय. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे त्याचा चांगला परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही होत आहे. सोशल मीडियावरही सध्या ‘सैय्यारा’चीच चर्चा आहे. या चित्रपटाचे रील्स, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. एखाद्या गोष्टीची अधिकाधिक चर्चा होऊ लागली की साहजिकच त्याविषयी कुतूहल निर्माण होतं. हेच कुतूहल आणि माऊथ पब्लिसिटी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून घेऊन येत आहे. पण ‘सैय्यारा’विषयी इतकी उत्सुकता का आहे, नवोदित कलाकारांना प्रेक्षकांकडून इतकं प्रेम का मिळतंय, सर्वत्र याच चित्रपटाची इतकी चर्चा का आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

तरुणवर्गाला आकर्षित करणारी लव्ह-स्टोरी

2013 मध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा ‘आशिकी 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या 12 वर्षांनंतर आता असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्याला ‘यंग लव्ह स्टोरी’ म्हणू शकतो. अशा प्रकारचे चित्रपट बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये बनत नव्हते. दिग्दर्शक मोहित सुरीने आधी ‘आशिकी 2’सारखा चित्रपट बनवला आणि तरुणवर्गाला थिएटरकडे आकर्षित केलं. त्यानंतर आता तशीच जादू त्याने पुन्हा ‘सैय्यारा’च्या माध्यमातून निर्माण केली आहे. अहान आणि अनितच्या लव्ह स्टोरीकडे तरुणवर्ग चांगलाच आकर्षित झाला आहे.

नवोदित जोडीची कमाल

‘आशिकी 2’मधल्या श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासारखंच अहान पांडे आणि अनीत पड्डा या फ्रेश जोडीने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. ‘आशिकी 2’ हा श्रद्धा आणि आदित्यचा पहिला चित्रपट होता. ही जोडी आजही लोकप्रिय आहे. तसंच प्रेम सध्या अहान आणि अनीतला मिळतंय. नवोदित कलाकारांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय.

View this post on Instagram

A post shared by Ahaan Panday (@ahaanpandayy)

प्रेक्षकांकडूनच प्रमोशन

‘सैय्यारा’च्या प्रमोशनवर फारसा खर्च करण्यात आला नव्हता. या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर-टीझरलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. कोणत्याही विशेष प्रमोशनशिवाय चित्रपट थेट थिएटरमध्ये सादर करण्याचा हा फंडा कामी आला. आजकाल चित्रपटांच्या प्रमोशनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु याउलट अहान आणि अनीत या दोघांना मीडियापासून दूरच ठेवण्यात आलं होतं. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकच त्याचं प्रमोशन करत आहेत.

नव्या कलाकारांचा परफॉर्मन्स

‘सैय्यारा’कडे प्रेक्षक आकर्षित होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचं अभिनय, परफॉर्मन्स. गेल्या काही वर्षांत जुनैद खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान, शनाया कपूर, सुहाना खान यांसारख्या अनेक कलाकारांचे प्रोजेक्ट्स प्रदर्शित झाले. परंतु मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून ते आपली प्रतिमा उभी करू शकले नाहीत. तेच काम आता अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून केलंय.

चित्रपटातील गाणी

‘आशिकी 2’च्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजही ती गाणी लोकप्रिय आहेत. हेच ‘सैय्यारा’च्या बाबतीत आहे. यातील गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. काही ठिकाणी तर लोकांनी थिएटरला थेट मिनी कॉन्सर्टचं रुप दिलं आहे. ‘सैय्यारा’, ‘हमसफर’, ‘तुम हो तो’ यांसारखी गाणी विशेष गाजत आहेत.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.