AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

41 व्या वर्षी माहिरा खान दुसऱ्यांदा होणार आई, शेअर केले बेबी बंपमधील खास फोटो, चाहत्यांकडून होतंय कौतुक

41 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. व्हायरल फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा. पहिला मुलगा आहे 17 वर्षांचा.

41 व्या वर्षी माहिरा खान दुसऱ्यांदा होणार आई, शेअर केले बेबी बंपमधील खास फोटो, चाहत्यांकडून होतंय कौतुक
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 13, 2026 | 3:40 PM
Share

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिची लोकप्रियता केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही मोठी आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्यासोबत ‘रईस’ चित्रपटात झळकलेली माहिरा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एका बातमीने सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

माहिरा खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांत भाव दिसत असून, या फोटोंनंतर चाहत्यांमध्ये तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्हज गाऊन परिधान केला असून, अत्यंत साध्या अंदाजात तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

माहिराच्या फोटोंनी वेधलं लक्ष

या फोटोंसोबत माहिराने लिहिलेल्या कॅप्शननेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. “आपण मिळून प्लॅन करतो, त्यानंतर जे होतं ते अल्लाहचा प्लॅन असतो,” अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे. तिची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छा आणि प्रार्थनांचा वर्षाव होत आहे. माहिरा आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या सुखरूपतेसाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

माहिराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने 2023 मध्ये व्यावसायिक सलीम करीम यांच्यासोबत लग्न केलं. या नात्यातून माहिराला हे पहिलं अपत्य असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, माहिराला तिच्या पहिल्या लग्नातून एक मुलगा आहे. तिने 2007 मध्ये अली अस्करी यांच्यासोबत लग्न केलं होतं. 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना अजलान नावाचा मुलगा असून तो आता 17 वर्षांचा आहे.

माहिराच्या फिल्मी कारकिर्दीचा विचार केला तर, तिने 2011 मध्ये ‘बोल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2017 मध्ये शाहरुख खानसोबत ‘रईस’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं.

आगामी चित्रपट

यानंतर माहिरा ‘अॅक्टर इन लॉ’, ‘ 7 दिन मोहब्बत इन’, ‘बिन रोए’, ‘मंटो’, ‘सुपरस्टार’ आणि ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘मिर्झा जट’ या चित्रपटाचाही समावेश आहे.

Mahira Khan- India TV Hindi

माहिराने शेअर केलेल्या या फोटोंमुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन