AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी समोसे विकत होता हा अभिनेता, आज आहे 12,490 कोटी रुपयांचा मालक, पदार्पण करताच झाला लोकप्रिय

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जो कधीकाळी विकत होता समोसे. आज हाच अभिनेता आहे 12,490 कोटी रुपयांचा मालक. पहिलाच चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी.

कधी समोसे विकत होता हा अभिनेता, आज आहे 12,490 कोटी रुपयांचा मालक, पदार्पण करताच झाला लोकप्रिय
| Updated on: Jun 22, 2026 | 7:23 PM
Share

बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ नशीबच नाही तर अथक मेहनत आणि चिकाटीही तितकीच महत्त्वाची असते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान. आज जगभरात लोकप्रिय असलेला हा सुपरस्टार एकेकाळी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) च्या कँटीनमध्ये समोसे पोहोचवण्याचे काम करत होता असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांनी केला आहे.

अलीकडेच एका यूट्यूब मुलाखतीदरम्यान पंकज कपूर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी NSDमध्ये घालवलेले दिवस आठवत एक खास किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, 1970 च्या दशकात ते NSDमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी एक लहान मुलगा वारंवार कँटीनमध्ये समोसे घेऊन येत असे. तो मुलगा म्हणजे पुढे जाऊन बॉलिवूडचा बादशाह ठरलेला शाहरुख खान होता.

पंकज कपूर यांच्या मते, शाहरुखचे वडील किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य NSDच्या कँटीन आणि मेसच्या व्यवस्थापनाशी संबंधित होते. त्यामुळे शाहरुख लहानपणी अनेकदा त्या परिसरात दिसायचा. मात्र, त्या वेळी कुणालाही कल्पना नव्हती की हा साधासुधा मुलगा भविष्यात भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवेल.

NSDशी शाहरुख खानचे खास नाते

शाहरुख खानचा NSDशी संबंध खूप जुना आहे. त्यांचे वडील मीर ताज मोहम्मद खान दिल्लीमध्ये ‘खातिर’ नावाचे रेस्टॉरंट चालवत होते. शाहरुखनेही अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांचे वडील NSDच्या मेस आणि कँटीनशी संबंधित कामांमध्ये सहभागी होते. त्यामुळे लहानपणापासूनच शाहरुखचा रंगभूमी आणि अभिनयाच्या वातावरणाशी जवळचा संबंध आला.

NSDमधून अनेक दिग्गज कलाकार घडले आहेत. त्यामध्ये अनेक कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या कामातून प्रेरणा घेत शाहरुखने अभिनयाचे धडे आत्मसात केले.

आज 12,490 कोटींच्या संपत्तीचा मालक

शाहरुख खानने 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, नवोदित कलाकार असूनही शाहरुखने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि पहिल्याच चित्रपटातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

एकेकाळी कँटीनमध्ये समोसे पोहोचवणारा शाहरुख खान आज जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 12,490 कोटी रुपये इतकी आहे.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट;
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट