AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विना कपडे रस्त्यावर धावली होती ही अभिनेत्री, प्रेमात झाली होती पागल, कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जी दिग्दर्शकाच्या प्रेमात वेडी झाली होती. प्रेमासाठी ती विना कपडे रस्त्यावर धावली होती. कोण आहे ती अभिनेत्री?

विना कपडे रस्त्यावर धावली होती ही अभिनेत्री, प्रेमात झाली होती पागल, कोण आहे ती अभिनेत्री?
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 18, 2026 | 12:40 PM
Share

Bollywood Actress : चित्रपटसृष्टीत अनेक प्रेमकथा गाजल्या. काही सुखात तर काही दु:खद शेवटाने लक्षात राहिल्या. अशाच एका वेगळ्या आणि धक्कादायक प्रेमकथेची चर्चा आजही केली जाते ती म्हणजे अभिनेत्री परवीन बाबी आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची.

परवीन बाबी या त्यांच्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आणि वेदनादायक प्रसंग होते.

परवीन बाबी यांना महेश भट्ट यांच्यावर प्रेम जडलं आणि दोघे लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्या वेळी महेश भट्ट विवाहित होते. या नात्यामुळे त्यांचं वैयक्तिक आयुष्य अधिक गुंतागुंतीचं बनलं. या काळात महेश भट्ट यांना कळलं की परवीन बाबी एका मानसिक आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांना सतत भीती वाटत असे की कोणी तरी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे.

विना कपड्याच्या रस्त्यावर धावल्या

महेश भट्ट यांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती अधिकच बिघडत गेली. एकदा महेश भट्ट कामावरून घरी परतले असता परवीन बाबी हातात चाकू घेऊन बसलेल्या दिसल्या. त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्या त्यांनाच धोका समजू लागल्या.

यानंतर महेश भट्ट रागाने घराबाहेर पडले. त्यावेळी परवीन बाबी त्यांना थांबवण्यासाठी घराबाहेर धावत गेल्या. त्या वेळी त्यांना भान राहिले नाही आणि त्या कपड्यांशिवाय रस्त्यावर धावत असल्याचे सांगितले जाते. ही घटना पाहून महेश भट्ट यांनी त्यांना पुन्हा घरात आणले.

दु:खद शेवट

परवीन बाबी यांचे आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेले होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये मोठे यश मिळवले पण वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

परवीन बाबी आणि महेश भट्ट यांची ही प्रेमकथा केवळ ग्लॅमरपुरती मर्यादित नव्हती तर ती मानसिक आरोग्य, नात्यांतील गुंतागुंत आणि भावनिक संघर्ष यांचेही वास्तव दाखवते. ही कथा आजही चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित आणि वेदनादायक प्रेमकथांपैकी एक मानली जाते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल