माझ्याशी बोल, इतरांच्या गळ्यात गळे… पत्नीचा लोकप्रिय अभिनेत्यावर गंभीर आरोप; इन्स्टा पोस्टने इंडस्ट्री हादरली

कलाकार हे कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असता. नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने केलेल्या आरोपाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता हा अभिनेता कोण आहे चला जाणून घेऊया...

माझ्याशी बोल, इतरांच्या गळ्यात गळे... पत्नीचा लोकप्रिय अभिनेत्यावर गंभीर आरोप; इन्स्टा पोस्टने इंडस्ट्री हादरली
Pawan Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2025 | 11:39 AM

कलाकार हे त्यांच्य लग्झरी आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. कधी त्यांच्या अफेअर्समुळे तर कधी वैवाहिक जीवनातील वादांमुळे. सध्या असाच एक प्रसिद्ध अभिनेता चर्चेत आहे. या अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्ट पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. चला जाणून घेऊया हा अभिनेता कोण आहे? आणि त्याच्या पत्नीने नेमके आरोप काय केले आहेत?

आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो भोजपुरी सिनेमातील पावर स्टार म्हणून ओळखले जाणारा पवन सिंह आहे. तो त्याच्या चित्रपट आणि गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु, अलीकडेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याची पत्नी ज्योती सिंहने तिच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पवन सिंहबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने पवन सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असून काही मोठे खुलासेही केले आहेत.

Video: साप चावल्यावर महिलेला रुग्णालयात नेण्याऐवजी पतीने जे केलं ते पाहून धक्काच बसला

29 ऑगस्ट रोजी पवन सिंहच्या पत्नीने तिच्या इंस्टाग्रामवर पवन सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो तिच्या कपाळावर कुंकू लावताना दिसत आहेत. यासोबतच तिने एक मोठं कॅप्शनही लिहिलं आहे. ज्योतीने लिहिलं की, “आदरणीय पती श्री पवन सिंह जी, मी गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्याशी काही कौटुंबिक आणि राजकीय मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण, तुम्ही किंवा तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांनी माझ्या कॉल्स किंवा मेसेजला उत्तर देणं योग्य समजलं नाही.”

‘मी कोणतं मोठं पाप केलं?’

पुढे ती म्हणाली, मी तुम्हाला भेटण्यासाठी लखनौपर्यंत गेले होते. छठच्या वेळी तुम्ही डिहरीला आलात तेव्हाही मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला. पण, तुम्ही भेटण्यास नकार दिला आणि सांगितलं गेलं की, बॉसने लखनौला भेटायला सांगितलं आहे. माझ्या वडिलांबद्दल बोलताना ज्योती म्हणाल्या, गेल्या दोन महिन्यांपूर्वी माझे वडीलही तुम्हाला भेटण्यासाठी गेले होते, पण तुम्ही कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मी असं कोणतं मोठं पाप केलं आहे की मला इतकी मोठी शिक्षा दिली जात आहे?

खोटं आश्वासन दिलं

पुढे तिने पवन सिंहवर आरोप केला की, माझ्या आई-वडिलांच्या सन्मानाशी खेळण्याचं काम केलं जात आहे. जर मी तुमच्या योग्य नाही किंवा नव्हते, तर तुम्ही मला आधीप्रमाणे दूर ठेवलं असतं. तुम्ही मला खोटी आश्वासनं देऊन तुमच्या लोकसभा निवडणुकीत तुमच्यासोबत घेऊन आलात आणि आज मला आयुष्याच्या अशा शिखरावर उभं केलं आहे की, मला आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. पण, मी असं करू शकत नाही, कारण मला माहित आहे की, मी आत्मदहन केलं तरी प्रश्न माझ्यावर आणि माझ्या आई-वडिलांवरच उपस्थित होतील.